Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुख्यमंत्र्यांसमोरच शिक्षकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 06:27 PM (IST)
नांदेड - ""संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या हुकूमशाहीमुळे जगण्याची इच्छा नाही,'' असे म्हणत अशोक माणिक गिते या शिक्षकाने शिक्षकदिनी (ता. 5) मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शेकडो शिक्षकांपुढे अंगावर रॉकेल ओतून घेतले. ही घटना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातच घडल्याने काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित शिक्षकाला तेथून बाहेर नेऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. 

रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू असताना हातातील कागदपत्रे उंचावत गिते यांनी व्यासपीठासमोर येण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार आहे, हे लक्षात येण्याअगोदरच गिते यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले. पोलिस बाहेर नेत असताना "हा माझा सत्कार आहे काय?' असे ते ओरडत होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री हा सर्व प्रकार पाहत होते.
श्री. गिते यांच्या हातातील कागदपत्रे पोलिसांच्या कारवाईत खाली पडली. ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवून घेतली. त्यांच्याकडून ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्याचे सांगितले जाते.

गिते व्यसनाधीन - जाधव
या संदर्भात संस्थाचालक वैजनाथ जाधव यांनी सांगितले, ""संस्थेचा शाळेच्या दैनंदिन कामकाजात काहीच संबंध येत नाही. गिते हे व्यसनाधीन झाले होते, त्यामुळे चौकशी समिती नेमून त्या अहवालानुसार त्यांना शाळेतून कमी करण्यात आले. पण, चौकशी समितीच्या कामकाजात काही त्रुटी राहिल्यामुळे प्राधिकरणाने गिते यांना पुन्हा रुजू करून पगार काढण्याचे आदेश दिले. त्यानंतरही तीन महिन्यांनी ते रुजू झाले; तेही दारू पिऊनच. त्या वेळी त्यांनी एका लहान मुलीला मारहाण केली. पालकांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हाही नोंदविला,'' असे जाधव यांनी सांगितले. जाधव हे मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असल्याचे सांगितले जाते.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 7:26 PM mahesh waghmare said:
हा प्रकार शासन आणि शिक्षण व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणारा आहे शिक्षण श्केत्रातील भ्रष्टाचार संस्था चालकांची मनमानी जातीयवाद टोकाला पोहचला आहे या निमित्ताने केवळ केवळ त्या एका शिक्षकाच्या प्रश्नाकडेच नव्हे तर अशा हजारो पीडीतांकडे लक्ष देऊन संस्था चालकांची मनमानी थांबवायला हवी


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: