Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

धुळे जिल्ह्यात नगावला महिलांचे दारूबंदी अभियान
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 04:06 PM (IST)

धुळे - नगाव (ता. धुळे) येथील बचत गटातील महिलांनी पुढाकार घेत गावासह परिसरात बेकायदेशीररीत्या दारू विक्रीचा प्रकार रोखण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. आज दुपारी रस्त्यालगत टपऱ्यांमधील दारूचा अनधिकृतसाठा पोलिसांना पकडून दिला. टपऱ्यांसह काही घरांमध्ये देशी व विदेशी मद्याचा साठा केला जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर लहान मुलांसह तरुण, प्रौढ दारूच्या आहारी जात आहेत. परिणामी, अनेक कुटुंबात रोज भांडणे, महिलांशी वाद, हाणामारीचे प्रकार वाढत असल्याने अखेर संतप्त महिलांनी स्वतः दारूबंदी अभियान हाती घेतले आहे.
 
आठवड्यापूर्वीच नगाव येथे रास्ता रोको करत आंदोलक महिलांनी धैर्याने अनेक टपऱ्या, घरांमधील अनधिकृत दारूचा साठा शोधून दिला होता. यानंतर पोलिस व उत्पादन शुल्क विभाग दखल घेऊन हा गैरप्रकार व गुन्हेगारी रोखतील, अशी आशा होती. परंतु, याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने आज पुन्हा संघटित होत महिलांनी शासकीय यंत्रणेच्या निषेधार्थ आंदोलन करत दारूचा साठा पकडून दिला. पोलिसांनी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: