Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

हिंगोलीत सराफ दूकान फोडले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 06:29 PM (IST)
Tags: theft,   crime,   hingoli

हिंगोली  - येथील सराफा बाजारातील ज्वेलर्सच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह 4 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज पळविल्याची घटना शनिवारी (ता. 04) घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रविवारी (ता.5) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील सराफा बाजारात संत नरहरी महाराज ज्वेलर्स हे सोने, चांदी विक्रीचे दुकान आहे. दुकान मालक सराफा व्यावसायिक तुळशीराम डहाळे हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दुकानबंद करून घरी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या चॅनल गेटचे कुलुप तोडले त्यानंतर दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील साहित्याची नासधूस केली. त्यानंतर चोरट्यांनी दुकानात ठेवलेली नऊ किलो चांदी, सात किलो चांदीचे दागिने, सात किलो चांदीचे फॅन्सी दागिने, पन्नास ग्राम सोन्याचे डोरले व रोख पंधरा हजार रुपये, असा एकूण 4 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला.

दुकानात चोरी झाल्याचे समजताच श्री. डहाळे यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक एम.ए. रऊफ, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बालाजी सोनटक्के, सहाय्यक पोलिस निरीक्षक झुंबरलाल लोंढे, श्री. आवटे, उपनिरीक्षक विजय रोडे, श्री. चव्हाण, विजय मिटपल्ले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री. कऱ्हाळे, प्रकाश अवचार, बाबू जाधव, फुलाजी सावळे, गिरीष कदम, विकी कुंदनानी, शैलेष मुदीराज यांच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी श्री. डहाळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक श्री. सोनटक्के पुढील तपास करीत आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: