Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

सीमेवर गोळीबारात 'लष्कर'चा दहशतवादी ठार
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 12:16 PM (IST)
Tags: terror,   jammu,   firing,   militant,   national

जम्मू - पुँच जिल्ह्यात सीमेवर आज (रविवार) सकाळी झालेल्या गोळीबारात लष्कर-ए-तैयबाचा संशयित दहशतवाद्याला ठार मारण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश मिळाले. या गोळीबारात एक जवान जखमी झाल्याचे, पोलिसांनी सांगितले.

सीमाभागात लष्कर-ए-तैयबाचे तीन ते चार दहशतवादी वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच राष्ट्रीय राफयल दलाचे जवान आणि पोलिसांनी पुँच जिल्ह्यात मेंधर तालुक्यातील भट्टीजदर या परिसरात शोधमोहिम सुरु केली. या मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबारास सुरवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
या घटनेनंतर जवानांकडून राजौरी जिल्ह्यातही शोधमोहिम करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 6:37 PM SHIVRAM VAIDYA said:
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपले सैन्य घुसवून तेथील पाकी अतिरेक्यांचे तळ उध्वस्त केल्याशिवाय अतिरेक्यांचे हे चाळे बंद होणार नाहीत. "तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येर्या गबाळ्याचे ते काम नोहे", या उक्तीप्रमाणे तेथे इंदिरा गांधी यांच्यासारखे कणखर नेतृत्वाच हवे. मनमोहन सिंग किंवा पी चिदंबरम यांच्यासारख्या बोलबच्चन नेत्यांचे ते काम नाही. निरपराधां लोकांचे मृत्यू घडत असताना सुद्धा हे नेते जनतेला शांत राहण्याचा कोरडा आणि नपुंसक उपदेश करत आहेत. जनता एकदा भडकली तर यांचे तख्त सुद्धा जाग्यावर राहणार नाही.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: