घाटकोपरमध्ये जुनी इमारत कोसळली; एक ठार
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 08:37 AM (IST)
मुंबई - घाटकोपर परिसरातील जुनी एक मजली शकुंतला इमारत आज (रविवार) सकाळी कोसळली. या दुर्घटनेत एक जण ठार झाला असून, पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई व उपनगरांत संततधार पाऊस पडत असून, जुन्या इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. आज सकाळी घाटकोपर परिसरात असणारी ही एक मजली जुनी इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरु आहे.