तीन पोलिसांची माओवाद्यांकडून सुटका
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 08:38 AM (IST)
पटना - बिहारमधील लखीसराय येथून अपहरण करण्यात आलेल्या तीन पोलिसांची आज (रविवार) सकाळी माओवाद्यांकडून सुटका करण्यात आली.
चार पोलिसांचे गेल्या रविवारी माओवाद्यांनी येथून अपहरण केले होते. त्यातील एक पोलिसाचा शुक्रवारी माओवाद्यांकडून खून करण्यात आला होता. यामुळे या तिन्ही पोलिसांच्या सुटकेसाठी सरकारने प्रयत्न सुरु केले होते. आज अखेर या तिन्ही अपहृत पोलिसांना सोडण्यात आले आहे. सुटका करण्यात आलेल्या पोलिसांची अभय यादव, एहतशाम खान, रुपेश ही नावे आहेत. माओवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून शनिवारी जंगल प्रभावित क्षेत्रात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यात आले होते.
सुटका करण्यात आलेल्या अभय यादव यांच्या पत्नीने माओवादी नेता स्वतः घरी येऊन तुमच्या पतीची सुटका केल्याचे सांगून गेल्याचे म्हटले आहे.