Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'त्या' खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची संधी
वृत्तसंस्था
Sunday, September 05, 2010 AT 11:23 AM (IST)

न्यूयॉर्क - स्पॉट फिक्सिंगचा आरोपावरून निलंबित करण्यात आलेल्या पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना या प्रकरणी आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी देण्यात येईल, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे (आयसीसी) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
 
पाकिस्तानचे इंग्लंडमधील उच्चायुक्त वाजीद शामसुल हसन यांनी शनिवारी आयसीसीवर पाकिस्तानी खेळाडूंना या प्रकरणात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी आज शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

पवार म्हणाले, ''आयसीसीच्या लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडून या तिन्ही खेळाडूंवर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या तिन्ही खेळाडूंना निलंबनाची नोटीस पाठविण्यात आली असून, हा अंतिम निर्णय नाही. या तिन्ही खेळाडूंना आपली बाजू स्पष्ट करण्याची संधी मिळणार आहे.''

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तर अमेरिकेतील शाखेचे उदघाटन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: