Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तरुणाच्या मृत्यूनंतर धुळ्यात तणाव
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 04:09 PM (IST)

धुळे - येथील ८० फुटी रोड परिसरातील नटराज चित्रपटगृहालगत व्यापारी संकुलात वसीम शेख मुश्‍ताक (वय २१, रा. रमजानबाबा नगर) याचा विजेच्या धक्‍क्‍याने की खून झाल्याच्या संशयावरून या भागात तणाव निर्माण झाला. त्याचे तीव्र पडसाद उमटले.
 
संतप्त जमावाने एसटी बस आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात बसचे नुकसान झाले, तर पोलिस अधिकाऱ्यासह दोन हवालदार जखमी झाले आहेत. पोलिसांनी लाठीमार करून स्थिती नियंत्रणात आणली. जिल्हा पोलिस अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रक्षुब्ध जमावाला शांत केले. वसीम शेख याच्या मृतदेहाचा पंचनामा सुरू असून त्याचा खून नव्हे, तर विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. अप्पर पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी मोनिका राऊत आदी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. या भागात तणावपूर्ण शांतता आहे. वसीम शेख याचा मृतदेह व्यापारी संकुलातील तळमजल्यात सकाळी आढळून आला. यानंतर दीडला नागरिकांमधील संतापाचा उद्रेक झाला.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 10:51 AM Ravindra D Pathak Indore said:
Totaly agreed with views of abve brothers. Stern action requared against such crime by dist & police Admn.
On 9/6/2010 9:19 AM Purushottam said:
हि कसली प्रतिक्रिया जनतेला वेठीस धरायचे म्हणजे काय तुम्हाला तूंची मते मांडता येतील ?, ज्या लोकांनी बस फोडली त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी , त्या तरुणाचा मृतू कशा मुले झाल याचा पोलिसांनी तपास करावा . कायदा हातात घेण्याची गरज नाही .
On 9/5/2010 8:54 PM SHIVRAM VAIDYA said:
सध्या काहीही झाले तर जमाव जनतेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यास सोकावलेला आहे. या तरुणाचा मृत्यू कशामुळे झाला याचा निर्णय लागण्या आधीच बस गाड्यांचे नुकसान कशासाठी? मुळात बस गाड्यांचे नुकसान करण्याचे कारणच काय? या नुकसानीची भरपाई त्याला जबाबदार असलेल्यांकडून करण्यात यावी, त्याशिवाय असल्या प्रकारांना आळा बसणार नाही. असल्या प्रवृत्ती विरुद्ध खंबीर पावले उचलण्याची गरज आहे.
On 9/5/2010 5:47 PM Piyush said:
ज्यांनी बस चे म्हणजे सरकारी मालमत्ते चे नुकसान केले , त्यांचा कडून भरपाई वसूल करा.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: