आयपीएलमध्ये यंदा फक्त ७४ सामने
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 01:38 PM (IST)
मुंबई - जगभरात लोकप्रिय झालेल्या इंडियन प्रिमियर लीगमध्ये (आयपीएल) पुढील वर्षी होणाऱ्या चौथ्या मोसमात ९४ एेवजी ७४ सामने खेळविले जाणार असल्याचा निर्णय, आज (रविवार) झालेल्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
आज झालेल्या बैठकीत आयपीएलच्या आगामी चौथ्या मोसमाबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. गेल्या तीन मोसमात एकाच संघातून खेळणाऱ्या कोणत्याही चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी संघ मालकांना असणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच यंदा सर्व खेळाडूंचा लिलाव नव्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रकमेतही वाढ करण्यात आली आहे.