Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

नदाल, क्‍लायस्टर्स, व्हीनसची आगेकूच
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 12:45 AM (IST)
न्यूयॉर्क - रॅफेल नदाल, किम क्‍लायस्टर्स आणि व्हीनस विल्यम्स या प्रमुख खेळाडूंनी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली आहे.

नदालने उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनवर तीन सेटमध्ये मात केली. दुसऱ्या सेटच्या टायब्रेकमध्ये नदालने दर्जा सिद्ध केला. त्याने सलग सहा गुण जिंकत बाजी मारली. 5-1 अशी आघाडी गेली तेथेच इस्तोमिनचा आत्मविश्‍वास खचला. पहिला सेट नदालने आरामात जिंकला होता. तिसऱ्या सेटमध्ये त्याने शेवटी ब्रेक मिळवीत विजय साकार केला. टायब्रेकमध्ये नशिबाची साथ लाभल्याचे नदालने सांगितले. यापूर्वी क्वीन्स क्‍लबमधील स्पर्धेत इस्तोमिनने नदालला कडवी झुंज दिली होती.

नदालची आता बिगरमानांकित फ्रान्सच्या गिल्लेस सायमनशी लढत होईल. सायमनने घोडदौड कायम ठेवली. त्याने 29व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलश्‍क्रायबर याच्यावर पाच सेटमध्ये मात केली. आता त्याची नदालशी लढत आहे. ब्रिटनच्या अँडी मरे याने जमैकाच्या डस्टिन ब्राऊनवर मात केली. ब्राऊनची सर्व्हिस भक्कम आहे. त्याने ड्रॉप शॉटच्या जोरावर मरेला जेरीस आणले होते.

अर्जेंटिनाच्या डेव्हिड नॅल्बॅंडीयननने फ्रान्सच्या फ्लोरेंट सेर्रावर तीन सेटमध्ये मात केली. नॅल्बॅंडीयनने वॉशिंग्टनमधील स्पर्धेत रॉबिन सॉडर्लिंग आदी मातब्बर स्पर्धकांना हरवून विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे त्याची संभाव्य विजेत्यांमध्ये गणना होत आहे. 0-2 अशा पिछाडीनंतर त्याने 66व्या क्रमांकावरील प्रतिस्पर्ध्याचे आव्हान मोडून काढले.

अमेरिकेचा "मॅरेथॉन मॅन' जॉन इस्नर याने मार्को चियूडीनेल्लीवर चार सेटमध्ये मात केली. आता त्याची रशियाच्या मिखाईल यूझ्नीशी लढत होईल. यूझ्नीने ड्यूडी सेलावर मात केली. दहावा मानांकित डेव्हिड फेरर, तेविसावा मानांकित फेलिसीयानो लोपेझ, आठवा मानांकित फर्नांडो व्हेरडॅस्को या स्पेनच्या तीन खेळाडूंनी आगेकूच केली.

महिला एकेरीत गतविजेत्या क्‍लायस्टर्सने पेट्रा क्विटोवाला तीन गेमच्या मोबदल्यात हरवून चौथी फेरी गाठली. 0-3 अशा पिछाडीवरून तिने सलग 12 गेम जिंकले. व्हीनसने 185व्या स्थानावरील मॅंडी मिनेल्लाला तीन गेमच्या मोबदल्यात हरविले, पण तिने पहिले दोन सर्व्हिस गेम गमावले होते. सर्बियाच्या ऍना इव्होनोविच हिने फ्रान्सच्या व्हर्जिनी रॅझानोचा पराभव केला. आता क्‍लायस्टर्स आणि इव्हानोविच यांची लढत होणार आहे.

निकाल
पुरुष एकेरी (दुसरी फेरी)
रॅफेल नदाल वि.वि. डेनिस इस्तोमिन 6-2 7-6 (7-5) 7-5
अँडी मरे वि.वि. डेव्हिड ब्राऊन 7-5 6-3 6-0
डेव्हिड नॅल्बॅंडीयन वि.वि. फ्लोरेंट सेर्रा 7-5 6-4 6-2
गिल्लेस सायमन वि.वि. फिलिप कोलश्‍क्रायबर 4-6 6-3 1-6 6-1 6-3
रायन हॅरिसन वि.वि. सर्जी स्टॅखोस्की 6-3 5-7 3-6 6-3 7-6 (8-6)
जॉन इस्नर वि.वि. मार्को चियूडीनेल्ली 6-3 3-6 7-6 (9-7) 6-4
मिखाईल यूझ्नी वि.वि. ड्यूडी सेला 6-1 6-3 4-6 6-3
डेव्हिड फेरर वि.वि. बेंजामिन बेकर 6-3 6-4 6-4
फेलिसीयानो लोपेझ वि.वि. बेनोईच पॅरी 6-4 6-7 (4-7) 5-7 7-6 (7-3) 6-2
फर्नांडो व्हेरडॅस्को वि.वि. ऍड्रियन मॅन्नारीनो 6-1 6-2 6-2

महिला एकेरी (तिसरी फेरी)
किम क्‍लायस्टर्स वि.वि. पेट्रा क्विटोवा 6-3 6-0
व्हीनस विल्यम्स वि.वि. मॅंडी मिनेल्ला 6-2 6-1
ऍना इव्हानोविच वि.वि. व्हर्जिनी रॅझानो 7-5 6-0
समंथा स्टोसूर वि.वि. सारा एर्रानी 6-2 6-3
एलेना डीमेंटीएवा वि.वि. डॅनिएला हॅंटुकोवा 7-5 6-2
फ्रान्सिस्का शियावोनी वि.वि. ऍलोना बॉंदारेन्को 6-1 7-5.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: