संमेलनाचा निधी 'मसाप'च्या महाकोशात जमा
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 03:55 PM (IST)
पुणे - पुण्यात झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या आयोजनातून शिल्लक राहिलेला ८२ लाख रुपयांच्या निधी आज (रविवार) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाकोशात जमा करुन घेण्यात आला. आज झालेल्या मसापच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साहित्य संमेलनाच्या हिशेबामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करीत पुण्यभूषण फाउंडेशनने हा हिशेब लवकर सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या संदर्भात चौकशीची मागणी केली होती, तसेच पालकमंत्री अजित पवार यांनी शिल्लक निधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या महाकोश प्रकल्पाला द्यावा, अशी सूचना केली होती. यानंतर संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी ८२ लाख रुपयांचा निधी 'मसाप'कडे जमा केला आणि आज तो निधी महाकोशात जमा करण्यात आला.