Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

नांदेड- समोर शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 06:27 PM (IST)
नांदेड - ""संस्थाचालक, शिक्षणाधिकारी यांच्या हुकूमशाहीमुळे जगण्याची इच्छा नाही,'' असे म्हणत एका शिक्षकाने शिक्षकदिनी (ता. पाच) मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री आणि शेकडो शिक्षकांपुढे आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातच घडल्याने काही काळ खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने संबंधित शिक्षकाला तेथून बाहेर नेऊन त्याचा गप्प बसविण्याचा प्रयत्न केला.

अशोक माणिक गिते असे या शिक्षकाचे नाव आहे.

रविवारी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू होते. त्याच वेळी हातातील कागदपत्रे उंचावत गिते यांनी व्यासपीठासमोर येण्याचा प्रयत्न केला. नेमका काय प्रकार आहे हे लक्षात यायच्या आतच कार्यक्रमात हजारो लोकांच्या साक्षीने गिते यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. मात्र, पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतले आणि बाहेर नेले. पोलिस बाहेर नेत असताना "हा माझा सत्कार आहे काय?' असे ते ओरडत होते. मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री हा सर्व प्रकार पाहत होते.

श्री. गिते यांच्या हातातील कागदपत्रे पोलिसांच्या कारवाईत खाली पडली, ती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मागवून घेतली. त्यांच्याकडून ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचल्याचे सांगितले जाते. याबाबत आता मुख्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे. दोषींवर कोणत्याही परिस्थिती कारवाई व्हायलाच हवी, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
प्रतिक्रिया
On 9/5/2010 7:26 PM mahesh waghmare said:
हा प्रकार शासन आणि शिक्षण व्यवस्थेला अंतर्मुख करायला लावणारा आहे शिक्षण श्केत्रातील भ्रष्टाचार संस्था चालकांची मनमानी जातीयवाद टोकाला पोहचला आहे या निमित्ताने केवळ केवळ त्या एका शिक्षकाच्या प्रश्नाकडेच नव्हे तर अशा हजारो पीडीतांकडे लक्ष देऊन संस्था चालकांची मनमानी थांबवायला हवी


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: