Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

कोयनेचे दरवाजे अडीच फुटांनी उघडले
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 05, 2010 AT 12:19 PM (IST)
सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्याने आज (रविवार) धरणाचे सर्व दरवाजे अडीच फुटांनी उघडण्यात आले आहेत.
 
या पावसाळ्यात प्रथमच शनिवारी एक फुटाने उघडण्यात आलेले दरवाजे आज अडीच फुटांपर्यंत उघडले. दरवाजे अडीच फुटाने उघडल्याने धरणातून प्रति सेकंद २४,८४१ क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदी पात्रात पाणी सोडल्याने पाटण तालुक्यातील संगमनगर येथील पुल पाण्याखाली गेला आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: