बिहारमध्ये विधानसभेसाठी सहा टप्प्यांत मतदान
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 06:29 PM (IST)
नवी दिल्ली - बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी सहा टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
२१, २४, २८ ऑक्टोबर आणि १, ९, २० नोव्हेंबरमध्ये मतदान होणार आहे. मतमोजणी २४ नोव्हेंबरला होणार आहे. बिहारमधील साडे पाच कोटी मतदार या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील एकूण ५६ हजार ९४३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
लोकसभेच्या बांका मतदारसंघाची पोटनिवडणूक एक नोव्हेंबरला होणार आहे.