झारखंडमध्ये नक्षलवाद्यांकडून पिता-पुत्राची हत्या
वृत्तसंस्था
Monday, September 06, 2010 AT 11:51 AM (IST)
रांची - झारखंडमधील गुमला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज (सोमवार) पिता-पुत्राची हत्या केली. जमिनीच्या वादातून ही हत्या केली गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया (पीएलएफआय)च्या सुमारे 20 सदस्यांनी रांचीपासून सुमारे 130 किलोमीटरवर असलेल्या अगरा गावात ही हत्या केली. बुधुवा आरांव आणि त्यांचा मुलगा अनिल आरांव यांना घरातून बाहेर खेचून ठार मारले, असे पोलिसांनी सांगितले.
जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे ते म्हणाले.