इंग्लंड, अर्जेंटिना उपांत्य फेरीत दाखल
-
Monday, September 06, 2010 AT 12:00 AM (IST)
रोझारियो (अर्जेंटिना (रॉयटर्स) - अर्जेंटिना आणि इंग्लंडने महिलांच्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. "ब' गटात या संघांनी पहिले दोन क्रमांक मिळविले असून त्यांच्यातील लढतीनंतर गटातील विजेता संघ ठरेल.
अर्जेंटिनाने काल चीनचा 2-0 असा पराभव केला. त्यांचे बारा गुण झाले आहेत. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर 2-1 असा विजय नोंदविला. चीनविरुद्धच्या सामन्यात अर्जेंटिनाकडून नोएल बॅर्रिओन्यूव्हो आणि कर्णधार ल्युसिना आयमार यांनी गोल केले.
हेलेन रिचर्डसन हिने केलेल्या दोन गोलमुळे इंग्लंडला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविता आला. दक्षिण आफ्रिकेचा एकमेव गोल पेटी कोएत्झी हिने नोंदविला.