श्रीनगर - उत्तर काश्मीरमधील पलहालन येथे आज (ता.6) दुपारी करण्यात आलेल्या पोलिस गोळीबाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या गोळीबारात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्याच्या चौकशीला सुरवात केली असल्याचे पोलिस खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले.
पोलिस गोळीबाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांकडील दारूगोळ्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
आंदोलकांनी आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पलहालन, पट्टण आणि सिंगपोरा येथे श्रीनगर - बारामुल्ला राष्ट्रीय महामार्ग बंद केला आणि वाहनांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात काही आंदोलक जखमी झाले. त्यापैकी फिरोज अहमद मलिक हा पलहालन येथील रहिवासी मरण पावला तर अन्य तीन जण जखमी झाले.
काश्मीर खोऱ्यात पांपोर, भोरी कडाल आणि बटामालू येथे दगडफेकीच्या घटना घडल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले.
Follow
Us on
Twitter