Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, हे तर "फिक्‍सर'
-
Monday, September 06, 2010 AT 12:51 AM (IST)
Tags: match fixing,   cricket,   pakistan,   hamid,   sports,   pcb
लंडन - क्रिकेट विश्‍वात खळबळ उडवून देणारे पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे "स्पॉट फिक्‍सिंग' प्रकरण रोज वेगळे वळण घेत आहे. पहिल्यांदा संशयाच्या घेऱ्यात आलेल्या तिघा खेळाडूंना सोडून देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौथ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूची चौकशी केली. त्याच वेळी ""पाकिस्तानी क्रिकेटपटू नव्हे, तर "फिक्‍सर' आहेत. ते प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी उत्सुक असायचे,'' असा गौप्यस्फोट सलामीचा फलंदाज यासीर हमीद याने रविवारी केला.
"फिक्‍सिंग'चे नवे प्रकरण उघडकीस आणणाऱ्या "न्यूज ऑफ दि वर्ल्ड' दैनिकाने पाकिस्तानी खेळाडूंचा नाकर्तेपणा सांगणारी आणखी काही उदाहरणे दिली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी क्रिकेट संकटात सापडले. ""एका बुकीने मला एक लाख पौंड देऊन कसोटी सामना "फिक्‍स' करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, आपण त्याला हाकलून दिले. या प्रकरणात जे खेळाडू चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत, त्यांचा प्रत्येक सामना "फिक्‍स' करण्यासाठी प्रयत्न असायचा. विशेष म्हणजे स्कॉटलंड यार्ड पोलिस कायम त्यांच्या मागे असायचे.''

मी असे बोललोच नाही
हमीदची ही खळबळजनक मुलाखत प्रसिद्ध झाल्यावर, हमीदने आपण असे बोललेलोच नाही, असे सांगितले. ""संघ सहकाऱ्यांवर मी असे आरोप करूच शकत नाही. संघ व्यवस्थापनाने मला या मुलाखतीबाबत जाब विचारला आहे. पण, मी या वृत्ताचा इन्कार करतो. यानंतर हमीदला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) उत्तेजक चाचणीस सामोरे जावे लागेल.

हमीदने या मुलाखतीत आणखी एक पाकिस्तानी खेळाडू चौकशीच्या घेऱ्यात अडकल्याचे तो म्हणत अशला, तरी त्याने त्याचे नाव सांगण्यास नकार दिला. तो म्हणाला,""पाकिस्तानच्या तीन क्रिकेटपटूंना "आयसीसी'च्या एकूण 23 आरोपांचा सामना करावा लागेल. त्यांच्यावर केलेला आरोप हा सहापानी आहे. मी बुकींकडून पैसा घेण्यास नकार दिल्यानेच मला संघातून वगळण्यात आले. दोन वर्षांनी मला संघात स्थान मिळाले. मी अपयशी ठरलो; पण गैरव्यवहार करणारे खेळाडू सापडले हे चांगले झाले.''
प्रतिक्रिया
On 9/6/2010 10:18 AM mandar said:
पाकिस्तानकडून आणखी कोणती अपेक्षा आहे ....जगातला दळभद्री देश म्हणजे पाकिस्तान
On 9/6/2010 5:09 AM बाजीराव पाटील said:
जे अशिक्षित आहेत (ज्यांना चारित्र्य म्हणजे काय हेच समजत नाही) त्यांच्यापासून दुसरे काय मिळणार आहे. आपल्या खेड्यातील गल्लीत विटी दांडू (गुल्ली डंडा) खेळणारे चिमुकले जसे वागतात त्यापेक्षा हे क्रिकेटपटू वेगळे वाटतात का?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: