सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र यांना मारहाण
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 07:59 PM (IST)
पुणे - लवासा प्रकल्पाच्या विरोधात निदर्शने करताना सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु.र. यांना आज (ता.6) मारहाण करण्यात आल्याची तक्रार पौड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
लवासा प्रकल्पाच्या समर्थकांनी संध्याकाळी आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याची तक्रार सुनीती सु.र. यांनी केली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.