Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मुंबईत विद्यार्थिनीवर माथेफिरूचा हल्ला
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 09:20 AM (IST)
मुंबई - मिठीबाई महाविद्यालयाच्या आवारात एका माथेफिरूने विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.

मिळालेली माहिती अशी - की संबंधित विद्यार्थिनी एका कामानिमित्त महाविद्यालयात आली होती. कामे संपल्यानंतर ती महाविद्यालयाबाहेरील पदपथावर मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत उभी होती. त्याचवेळी एक अज्ञात माथेफिरू तेथे आला. त्याने रस्त्यावरील गाड्यांच्या काचा फोडण्यास सुरवात केली. त्यानंतर अचानक त्याने आपला मोर्चा विद्यार्थ्यांच्या दिशेने वळवला. त्याने सदर विद्यार्थिनीच्या डोक्‍यावर आणि हातावर वार केले. हा प्रकार पाहून इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तो पळून गेला. हल्ल्यात विद्यार्थिनी जखमी झाली आहे.
प्रतिक्रिया
On 24/09/2010 09:24 AM Bhushan said:
शेवटी नावच माथेफिरू ... पण बाकी शोध झालाच पाहिजे ..पण होईल का हा एक प्रश्न्न ???
On 9/6/2010 4:34 PM sachin said:
police should take strice action
On 9/6/2010 1:50 PM geeta mane said:
लोक की बघत बसले होते का? इतका माथे फिरू गाड्यांच्या काचा फोडे पर्यंत सगळे की झोपेत होते?आणि का विद्याथ्निवर हल्ला होई पर्यत की लोकांनी त्याला काहीच केले नाही...
On 9/6/2010 10:30 AM Ulhas Dev said:
Give that person ( bOy ) Death.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: