ग्रामपंचायत निवडणुकांची राज्यभरात आज मतमोजणी
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:00 AM (IST)
मुंबई - राज्यात 1,920 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आज मतदान झाले. काही ठिकाणी पावसाच्या हजेरीत मतदारांनी आपला हक्क बजावला. मतमोजणी उद्या (ता. 6) होणार आहे. दरम्यान, 256 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केले नाहीत.
12 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका झाल्या.