Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

पाकमध्ये आत्मघाती बॉंबहल्ला; आठ ठार
पीटीआय
Monday, September 06, 2010 AT 10:31 AM (IST)
इस्लामाबाद - वायव्य पाकिस्तानच्या लक्‍की मुरव्वत या शहरातील पोलिस ठाण्याजवळ झालेल्या आत्मघाती बॉंबहल्ल्यात आठ जण ठार झाले. तर, 50 जण जखमी झाले. आज (सोमवार) सकाळी ही घटना घडली. बॉंबस्पोटाच्या वेळी पोलिस ठाण्यात 45 पोलिस होते.

शहराचा मध्यवर्ती परिसर असल्याने येथे नेहमीच गजबज असते. आजही गर्दीच्या वेळी बॉंबहल्ला झाल्याने नागरिक मोठ्या संख्येने जखमी झाले आहेत. पोलिस ठाण्याजवळ असलेल्या शाळा आणि सरकारी इमारतीचे नुकसान झाले आहे.

सध्या मृतांचा आकडा आठ असला तरी तो वाढण्याची शक्‍यता आहे. घटनास्थळाची पाहणी करण्यात येत असून, त्यानंतरच घटनेचे चित्र स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

संरक्षण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी नाकाबंदी केली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारवाया जोरदारपणे सुरू असून, गेल्या काही दिवसांत झालेल्या विविध बॉंबस्फोटामध्ये 110 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. मागील आठवड्यात अतिरेक्‍यांनी लाहोर आणि क्वेटाला लक्ष्य केले होते.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 5:58 PM prasad said:
पेरावे तसे उगवते!
On 9/6/2010 12:14 PM piyush said:
पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला आहे ..


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: