आई- वडिलांची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद...
पीटीआय
Monday, September 06, 2010 AT 12:27 PM (IST)
लखीसराय - आई- वडिलांची प्रार्थना आणि देवाचे आशीर्वाद, यामुळेच मी आज जिवंत आहे, आणि याचा मला आनंद आहे, असे भावनाप्रधान उद्गार बिहार पोलिसांचे अधिकारी रुपेशकुमार सिन्हा यांनी आज येथे काढले.
मागील रविवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी चार पोलिसांचे अपहरण केले होते. त्यात रुपेशकुमार यांचाही समावेश होता. आज सकाळी माओवाद्यांनी तिघांना सोडले. त्यानंतर ते बोलत होते. माध्यमांशी बोलताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
तर, अभय प्रसाद यादव यांच्या पत्नी रजनीदेवी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या, देवाने माझी प्रार्थना ऐकली, त्याबद्दल मी देवाची आभारी आहे. त्याचबरोबर माझ्या पतीला सुखरूप सोडणाऱ्या माओवादी बांधवांचेदेखील धन्यवाद मानते. मी माझ्या पतीची अतुरतेने वाढ पाहात होते. बिहार प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून त्यांना लवकरात लवकर परत आणले.
यादव, सिन्हा आणि एहसान खान यांचे माओवाद्यांनी 29 ऑगस्ट रोजी अपहरण केले होते. त्यांना आज सकाळी कजरा-छानन जंगलात सोडण्यात आले.
तीनही पोलिसांना न्याय मिळवून देण्यात आम्हाला यश आले आहे, असे लखीसरायचे पोलिस अधिक्षक रणजितकुमार मिश्रा म्हणाले.
तिघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे लखीसराय रुग्णालयाचे डॉ. धर्मा देव सिंह यांनी सांगितले.