Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

थॉमस यांची नियुक्ती घटनाविरोधी - भाजप
सकाळ न्यूज नेटवर्क (snn.nsk@esakal.com)
Monday, September 06, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: thomas,   bjp,   cvc,   snn

नवी दिल्ली - स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार लपविण्यासाठी सरकारने केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) प्रमुखपदी थॉमस यांची नियुक्ती केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. थॉमस यांची नियुक्ती हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे. या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीच्या निवडीसंदर्भात संसदेच्या विरोधी पक्षनेत्यांचे मत नोंदवून घेतले जात नसेल, तर त्यांना बैठकीला बोलावण्यात काय अर्थ आहे, असा संतप्त प्रश्‍नही भाजपने केला आहे.

"सीव्हीसी' प्रमुख पदावरील व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री व विरोधी पक्षनेते यांची बैठक घेण्याचा संकेत आहे. यासाठी शनिवारी (ता. 4) झालेल्या बैठकीत थॉमस यांचे नाव येताच स्वराज यांनी त्यास आक्षेप घेतला. दूरसंचार विभागाच्या सचिवपदी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने स्पेक्‍ट्रम गैरप्रकाराच्या चौकशीवर त्याचा थेट परिणाम होईल, असा भाजपचा दावा आहे. सरकारने सुचविलेल्या तीन नावांपैकी थॉमस वगळता विजय चटर्जी व कृष्णन या दोन ज्येष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करा, असे स्वराज यांनी सुचविले. थॉमस यांचे नाव यापूर्वी केरळमधील पामतेल गैरप्रकारांत आले असल्याने स्वराज यांनी त्यांच्या नावाला आक्षेप घेतला होता. या बैठकीच्या अगोदरच थॉमस यांचे नाव निश्‍चित करण्यात आले होते, असा आरोपही पक्षाने केला. इतकेच नव्हे, तर आगामी राष्ट्रकुल स्पर्धा गैरव्यवहारावरही त्याचा परिणाम होण्याची भीतीही भाजपने व्यक्त केली.

सोनिया गांधींवर टीकास्त्र
बिहारमध्ये पोलिसांच्या अपहरणास कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांची वक्तव्येच जबाबदार असल्याच्या आरोपांचाही भाजपने पुनरुच्चार केला. मात्र, बिहारमधील भाजपचे मित्र व मुख्यमंत्री नितीशकुमार हे माओवाद्यांच्या बाजूने वक्तव्ये देत असल्याच्या वृत्ताबाबत पक्षप्रवक्ते तरुण विजय यांनी गुळमुळीत उत्तर देऊन वेळ मारून नेली.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: