Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

मनोमीलन चळवळीकडे राजची पाठ
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई  -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या मनोमीलनासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांत आज दोन्ही बंधूंनी कोलदांडा घातला. त्यामुळे मनोमीलनाचा संदेश घेऊन आज "कृष्णकुंज' व "मातोश्री'वर गेलेल्या कार्यकर्त्यांची मने काहीशी खट्टू झाली. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांचे निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.

शिवसेना-"मनसे'तील दुहीमुळे हतबल झालेल्यांनी "माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा' याअंतर्गत आज सकाळी शिवाजी पार्क येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला हार घालून मूकमोर्चा काढला. राज व उद्धव यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी पुन्हा एकत्र यावे, यासाठी शिवाजी पार्क येथे स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. त्यास शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी चांगला प्रतिसादही दिली. विशेष म्हणजे मोर्चाला ज्येष्ठ शिवसैनिकांची उपस्थितीही लक्षणीय होती. शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार व माजी आमदार सुरेश गंभीर हेही मोर्चात सहभागी झाले होते; पण "प्रजा उत्साही मात्र, राजा उदासीन' असेच काहीसे चित्र या मोर्चादरम्यान पाहायला मिळाले. लेखी पूर्वकल्पना देऊनही राज यांनी घरी न राहणेच पसंत केले. दुसरीकडे उद्धव यांनी मात्र कार्यकर्त्यांची भेट घेतली; मात्र त्यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार दिला.
 
या वेळी बोलताना उद्धव म्हणाले, ""हे आंदोलक मॉंसाहेबांच्या पुतळ्याला वंदन करून निघाले आहेत आणि घरी आलेल्यांचा सन्मान करणे ही "मॉं'चीच शिकवण असल्यामुळे मला यांची भेट घेणे भागच आहे. अन्यथा, हे कोणत्या उद्देशाने येथे आलेत यात मला रस नाही. राहिला भाग मराठी माणसाच्या हिताचा, तर शिवसेनेचा जन्मच मुळी मराठी माणसाच्या हितासाठी झाला आहे. मराठी माणसाने भगव्याखाली एकत्र यावे तरच मराठी माणसाची ताकद वाढेल.''

दरम्यान, आज आमची सहामाही परीक्षा असून त्यात आम्ही काठावर पास झालो. आंदोलनाचा दुसरा टप्पा दसऱ्याच्या दिवशी असून याची फायनल 23 जानेवारी, 2011 ला होणार आहे. तेव्हा आम्ही प्रचंड जाहीर सभा घेऊन या नेत्यांना एकत्र येण्यास भाग पाडू, असा विश्‍वास या चळवळीचे प्रवक्ते सतीश वळंजू यांनी व्यक्त केला.
 
प्रतिक्रिया
On 06/05/2011 02:18 PM yogesh sukhdeo kardile said:
दोन्ही भाऊ पक्ष आणि कार्यकर्ते आपली प्रायव्हेट प्रोपारती आहे अश्या गुर्मीत वागत आहेत, इतिहास विसरणे हा मराठी माणसाचा गुण आहे आणि तो दोन्ही भाऊ काटेकोर पाने पळत आहे .ह्या वेळी बाळासाहेबांनी इतरांना उपदेश करण्या ऐवेजी दोन्ही भावना एकत्र आणून मराठी माणसासाठी आदर्श घालून द्यावा ... जय हिंद जय महाराष्ट्र .... yogesh kardile
On 9/6/2010 5:21 PM amol said:
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन मराठी लोका साठी काम केले पाहिजे आणि कॉगरेस सरकार ला घालवून मराठी माणसाच सरकार यायला.पाहिजे ,मनून राज आणि उद्धव एकत्र येऊन मराठी लोकांसाठी लडल पाहिजे.राज साहेब मराठी माणसाठी .एकत्र या ,,,,,,,,,,,,,,,,,,,,एक मराठी माणूस,
On 9/6/2010 3:24 PM dev said:
शिसेना आणि मनसे काही एक होणार नाहीत. मराठी माणसांचे राज्य काय येणार नाही. शेवटी आपण मराठी माणसं- मोडेल पण वाकणार नाही.
On 9/6/2010 12:35 PM ramesh padwal said:
मराठी लोकांमध्ये फुट पाडणे हे मनसेचे कारस्थान आहे. आंदोलन शिवसेनेचे असू नाही तर मनसेचे असू आंदोलनामुळे मराठी माणसाची डोकी फुटतात तर राजसाहेब मराठी माणसाना भेटू का शकत नाही. राजसाहेब दुसरे बाळासाहेब होयला बगतात का. पण शेवटी एवडेच म्हणेन बाळासाहेब बाळासाहेब आहे हे कोणी विसरू नये. जर मराठी लोकांची यांनी दिशाभूल कि याचे उत्तर येत्या निवडणूक मधी मिळेल. जर दोन भाऊ एकत्र येत नसेल तर मराठी माणसाचे नुकसान आहे. ह्या दोघा भवानी मराठी बद्दल बोलू नये.
On 9/6/2010 11:40 AM KAILASH said:
मराठी माणसांची शिवसेना हि बाळासाहेब असेपर्यंत होती. हि उद्धव ची शिवसेना लाहीचना, उत्तर प्रदेशदिन, बिहारी महोत्सव, छत पूजा सुरु करणारी सेना झाली होती. म्हणून राज ठाकरेंनी मराठी माणसांची फक्त मराठी माणसांसाठी मनसे काढली आहे . मराठी-मराठी करणारी शिवसेना केव्हाच संपली आहे जेव्हा राज, राणे, नाईक, बुझबल, ..... सोडून गेले व निरुपम, प्रीतीश नांदी, नीलम घोरे , संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, पटेल, .... सारख्या tv चेहऱ्यांनी, परावलंबी, कानफुक्यानी, उद्धव सह लढणारी शिवसेना संपवून टाकली राहिली ती टोळी आहे
On 9/6/2010 10:55 AM mohan said:
राज हि युती कधीही करणार नाहीत कारण त्यांना कॉंग्रेस ला मदत करायची आहे जर ते खरच मराठी माणसांचे हित बघायचे असेल तर ते युती करतील
On 9/6/2010 10:15 AM ashok solkar said:
मा.सतीश वळंजू आपणास माहित आहे कि .शिवरायांच्या भगव्या झेंड्या खाली मराठी माणूस अबाधित राहिला पाहिजे.म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेमुळे मराठी माणूस एकत्र आला तो झेंडा मराठी माणसाने जपला पाहिजे. मराठी हि शिवसेनेची नस आहे. हे राज ठाकरे यांना माहित आहे.म्हणून शिवसेनेच्या छत्राखाली असलेल्या मराठीमाणसा मध्ये फुट पाडून आपणच मराठी माणसाचे कैवारी आहोत असे लोकांना भासवायचे.असा मानस राज यांच्या आहे. आणि शिवसेनेवर म्हणजेच मराठीमाणसावर अविश्वास दाखवून आपली राजकीय पोळी भाजूनघ्यावयाची आहे .
On 9/6/2010 9:53 AM NITIN KAMBLE. said:
मनोमिलन होऊ अथवा न होऊ पण दोघांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी लढले पाहिजे कारण दोघेही मराठी तसेच महाराष्ट्राचे नेतृत्व चांगले करू शकतात.
On 9/6/2010 9:14 AM ashok solkar said:
मा.सतीश वळंजू आपणास माहित आहे कि .शिवरायांच्या भगव्या झेंड्या खाली मराठी माणूस अबाधित राहिला पाहिजे.म्हणून शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेनेमुळे मराठी माणूस एकत्र आला तो झेंडा मराठी माणसाने जपला पाहिजे. मराठी हि शिवसेनेची नस आहे. हे राज ठाकरे यांना माहित आहे.म्हणून शिवसेनेच्या छत्राखाली असलेल्या मराठीमाणसा मध्ये फुट पाडून आपणच मराठी माणसाचे कैवारी आहोत असे लोकांना भासवायचे.असा मानस राज यांच्या आहे. आणि शिवसेनेवर म्हणजेच मराठीमाणसावर अविश्वास दाखवून आपली राजकीय पोळी भाजूनघ्यावयाची आहे .
On 9/6/2010 8:40 AM archana samant said:
प्रयत्न चांगला आहे. प्रयत्नांती परमेश्वर!!!!!! असेच प्रयत्न चालू राहावेत यासाठी शेभेच्छ!
On 9/6/2010 7:04 AM arun said:
ज्यांच्या जीवावर पक्ष चालवतात त्या आपल्या फौजेच्या भावना जे लक्षात घेत नाहीत ते देशाचे प्रश्न कसे सोडवणार? " मनसे style " उत्तर लोकांना देणारे स्वत: मात्र पसार? हे stylish राजकुमार कमालीचे पोकळ निघाले.
On 9/6/2010 5:31 AM rajendra said:
उद्धव आणि राज ठाकरे यांना एकत्र आणणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जमले नसताना अन्य कोणाला त्यात यश येण्याची तिळमात्र शक्यता नाही. परिणामी ठाकरे जोडोसाठी चळवळ उभारणारे सतीश वळंजू व अन्य कार्यकर्त्यांचे प्रयत्न निर्थक ठरणार आहेत.
On 06/09/2010 03:32 abhi said:
किरण आणि पुणेकरान बरोबर मी सहमत आहे . सध्या दोन्ही भावांनी वाद विसरणे हे त्यांच्या आणि आम्हा मराठी जणांसाठी फायद्याचे आहे . आज राज साहेब वाळूंज साहेबांना भेटले नाहीत हे खूपच वाईट वाटले . राज साहेब आज तुम्ही खूपच चुकीचे वागलेत आज तुमच्या या कृतीने असंख्य मराठी बांधवाना खूप दुख झाले आहे तरी कृपया पुन्हा असे करू नका . जय महाराष्ट्र जय मराठी .
On 9/6/2010 12:47 AM kiran said:
दोन्ही भाऊ पक्ष आणि कार्यकर्ते आपली प्रायव्हेट प्रोपारती आहे अश्या गुर्मीत वागत आहेत, इतिहास विसरणे हा मराठी माणसाचा गुण आहे आणि तो दोन्ही भाऊ काटेकोर पाने पळत आहे .ह्या वेळी बाळासाहेबांनी इतरांना उपदेश करण्या ऐवेजी दोन्ही भावना एकत्र आणून मराठी माणसासाठी आदर्श घालून द्यावा ... जय हिंद जय महाराष्ट्र ....
On 9/6/2010 12:41 AM punekar said:
वाळूंज साहेब तुम्ही कष्ट खूप घेतात. अहो ह्यांना सगळे आयते मिळाले आहे. त्यांना कशाची फिकीर. त्यापेक्षा असू करू या आपण च आपला महाराष्ट्र घडू यात. नाही तरी राजा पेक्षा देखील प्रजा महतवाची. राजा आज आहे उद्या नाही. पण प्रजा आजही आहे आणि उद्या व निरंतर राहणारच आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: