Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

ब्रिटनच्या संसद सदस्याची पत्नी वेश्‍याव्यवसायात
वृत्तसंस्था
Monday, September 06, 2010 AT 05:09 PM (IST)
Tags: britain,   mp,   prostitute,  
लंडन - ब्रिटनमधील संसदेचे सदस्य माईक वेदर्ले यांची पत्नी वेश्‍याव्यवसाय करीत असल्याचे वृत्त येथील "संडे मिरर' या वृत्तपत्राने दिल्यामुळे खळबळ उडाली. या गौप्यस्फोटामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रिया वेदर्ले यांनी व्यक्त केली.

वेदर्ले यांची ३९ वर्षीय पत्नी कार्ला ही मूळची ब्राझीलमधील आहे. दहा वर्षांपूर्वी रिओ दी जानेरोच्या दौऱ्यावर असताना वेदर्ले यांची कार्लाशी ओळख झाली. त्यावेळी कार्ला तिथे वेश्‍या व्यवसाय करीत होती, अशी माहिती सूत्रांनी दिल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यावेळी वेदर्ले यांना याची माहिती होती का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सन २००३ मध्ये विवाह केल्यानंतर वेदर्ले यांनी कार्लाला ब्रिटनमध्ये आणले. या दोघांच्या विवाहाच्या प्रमाणपत्रावर कार्ला गृहिणी असल्याचे नमूद केलेले आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये वेदर्ले निवडणुकीच्या प्रचारामध्ये गुंतल्यानंतर कार्लाने परत वेश्‍याव्यवसाय करण्यास सुरवात केल्याची माहिती वृत्तपत्राने दिली आहे. दरम्यान, निवडणुकीत वेदर्ले यांच्यासाठी प्रचार करणारे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे या गौप्यस्फोटामुळे अडचणीत येण्याची शक्‍यता आहे.
प्रतिक्रिया
On 06/09/2010 22:13 pahatpakshi said:
भारतात सुद्धा हा प्रकार नवा नाही ...
On 06/09/2010 18:19 jagruk punekar said:
कॅमेरून ना अडचणीत यायचे काय कारण? त्यांची अन कार्लाची काही 'अरेंजमेंट ' तर नव्हती ना?


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: