Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

संशयित खेळाडूंना दूरच ठेवा - आफ्रिदी
वृत्तसंस्था
Monday, September 06, 2010 AT 01:00 AM (IST)

कार्डिफ - एकदिवसीय सामन्यांसाठी पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदी याने रविवारी "फिक्‍सिंग' प्रकरणाबाबत प्रथमच कडवट प्रतिक्रिया व्यक्त केली. तो म्हणाला, ""मालिका आणि संघाचे हित लक्षात घेता सलमान बट्ट, महंमद आसिफ, महंमद आमीर या तिघा संशयित खेळाडूंना ड्रेसिंगरूमच्या आसपासही फिरकू दिले जाऊ नये.''

या "फिक्‍सिंग' प्रकरणात या तिघा खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चौकशी केली होती. या प्रकरणात आज आणखी एका खेळाडूचे नाव असल्याचा दावा केला जात असला तरी इंग्लंडविरुद्धची मालिका पूर्वनियोजित वेळेप्रमाणे होणार असून, आम्ही कठिण परिस्थितीमधून जात आहोत. अशा वेळी या परिस्थितीचा सामनाही करत आहोत.आमच्या प्रत्येकासाठी इंग्लंड मालिका खूप महत्त्वाची आहे. सर्व खेळाडूंच्या नजरा त्याकडेच आहेत.''

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आल्यापासून आफ्रिदीने स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवले होते. ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तान संघ कार्डिफमध्ये हजर झाला तेव्हा त्याने प्रथमच त्या तीन खेळाडूंच्या वतीने क्रिकेट रसिकांची माफी मागितली. तो म्हणाला,""या खेळाडूंनी काय केले ?, काय केले नाही हे चौकशीत समोर येईल; पण सध्या तरी ते दोषी आहेत. त्यांच्या कृत्याबद्दल मी माफी मागतो. आम्ही सर्व खेळाडू आता एकदिवसीय मालिकेकडे लक्ष ठेवून आहोत.''

आफ्रिदी कधीच गळाला लागला नाही - माजीद
जवळजवळ पाकिस्तानचा संपूर्ण संघ बुकी मजहर माजीदच्या खिशात असताना, एका खेळाडूला तो कधीही आपल्या बाजूला ओढू शकला नाही. तो खेळाडू म्हणजे शाहीद आफ्रिदी. माजीद म्हणतो, ""अनेकवेळा मी आफ्रिदीला खरेदी करण्याचा प्रयत्न केला; पण माझ्या कृष्णकृत्यांना त्याने कधीच भीक घातली नाही.''
प्रतिक्रिया
On 9/6/2010 3:26 PM Raj Patil said:
yachya bolnyatunach kahitari gaudbangal laple aahe... sagle chor ani ha yektach kasa dhutlya tandalasarkha aahe ?
On 9/6/2010 1:33 PM gambhir7 said:
gali gali mai shor hai , pakistan चोर hai ..............
On 9/6/2010 11:51 AM kishor said:
या संशयित खेळाडूंना जन्मभर बंदी करण्यात यावी.
On 9/6/2010 8:38 AM sasonkar yardena israel said:
खेळाडूंनी काय केले , काय केले नाही हे चौकशीत समोर येईल; पण सध्या तरी ते दोषी आहेत.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: