Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

श्रीकांतने सुरू केली "करियर' वेबसाईट
यूएनआय
Monday, September 06, 2010 AT 06:40 PM (IST)

चेन्नई - एकेकाळी क्रिकेटचे मैदान गाजवणारा कृष्णम्माचारी श्रीकांत आता "ई-लर्निंग'च्या क्षेत्रात उतरला आहे. तरूणांचे जीवन यशस्वी व्हावे यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याचा त्याचा हेतू आहे.

"करियरस्ट्रोक्‍स डॉट कॉम' ही इंटरऍक्‍टिव्ह वेबसाईट आज लॉंच करण्यात आली असून त्याद्वारे आता 18 ते 27 वयोगटातील तरूणांना मार्गदर्शन करणार असून त्यासाठी साधन म्हणून त्याने क्रिकेटचाच आधार घेतला आहे.

"पदवीचे तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या तसेच तरूण व्यावसायिकांना त्यांच्या करियरमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देण्याबरोबरच त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी आणि कौशल्य शिकवण्यासाठी हे ई-लर्निंग पोर्टल सुरू करण्यात आले आहे,'' असे तो म्हणाला.

यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असलेली कौशल्ये शिकवण्यासाठी 12 मोड्यूल्सचा 90 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यासाठी 990 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

ध्येयनिश्‍चिती, करियरची आखणी, नेतृत्व कौशल्य आणि व्यवस्थापन, ताणतमावांचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, प्रेरणा आणि आत्मविश्‍वास, दोन व्यक्तिंमधील संवाद कौशल्य आणि वेळेचे नियोजन, व्यावसायिक जागरूकता आणि लेखन कौशल्य असा भरगच्च कार्यक्रम या प्रशिक्षणासाठी निश्‍चित करण्यात आला आहे.

अतिशय कमी वेळात हे सर्व प्रशिक्षण देण्यासाठी क्रिकेटच्या परिभाषेचा वापर करण्यात येणार आहे. क्रिकेट हा भारताचा धर्म असल्याने त्यातील उदाहरणांमुळे व्यवस्थापनातील अतिशय गुंतागुंतीचे मुद्दे समजणे सहज शक्‍य होईल असे श्रीकांतला वाटते.

जगभरातील विद्यार्थी आणि तरूण व्यावसायिकांपर्यंत पोहोचण्यासाठी इंटरनेटचा प्राथमिक साधन म्हणून निश्‍चितच उपयोग होणार असल्याचे श्रीकांतचे म्हणणे आहे.
 
Follow
Us on
Twitter
 

 
प्रतिक्रिया
On 9/7/2010 12:11 AM shrikant landge said:
गुड .. All the best
On 9/6/2010 11:07 PM Prathamesh D Rao said:
very good news Best Wishes
On 9/6/2010 7:59 PM jadhav satish said:
this very good news for us shrikant is idol for indian people elearning & internate is first and last gear congrates mr Shrikant
On 9/6/2010 7:37 PM Sanjay Godbole said:
Best Wishes to Mr. K Shrikant


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: