मुंबई - बोरिवलीच्या पश्चिम भागातील एका व्यापारी इमारतीतील जागेची विक्री दीड लाख रूपये प्रति चौरस फूट दराने झाली आहे. मात्र, या परिसरातील जागेच्या व्यवहारांसाठी हा भाव आधारभूत ठरणार नाही असे तज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे एका मटकाकिंगने हा व्यवहार केला आहे.
बोरिवलीतील मंगलकुंज या पाच इमारतींच्या संकुलात सुमारे शंभर दुकाने आहेत. या संकुलातील एक लाख चौरस फूट जागा एका मटकाकिंगला विकण्यात आली आहे.
"चढ्या भावाने झालेल्या अशा एखाद्या मोठ्या व्यवहाराची अंतिम किंमत जर त्या भागातील सर्वसाधारण दरापेक्षा फारच जास्त असेल तर त्याचा परिणाम साधारणपणे त्या परिसरातील जागेच्या किंमतीवर होत नाही,'' असे जोन्स लॅंग लॅसेल मेघराज (जेएलएलएम) चे अध्यक्ष आणि भारतातील व्यवसायाचे प्रमुख अनुज पुरी यांनी सांगितले.
"बोरिवलीतील जागांचे दर मध्यम गटातील उत्पन्नानुसार ठरतात. तेथील कोणताही बांधकाम व्यावसायिक अशा चढ्या भावाने झालेल्या व्यवहारापेक्षा सध्याचे प्रचलित दर विचारात घेतो. असे असले तरी सध्या बोरिवलीतील जागांचे भाव वाढत आहेत,'' असेही पुरी यांनी सांगितले.
Follow
Us on
Twitter