कोल्लम - केरळमधील वेन्याद जिल्ह्यामध्ये माओवाद्यांनी त्यांच्या कारवाया केंद्रीत केल्या असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली असल्याचे केंद्रीय गृहसचिव जी.के. पिल्लई यांनी आज (ता.6) सांगितले. निंदकारा सागरी किनारा पोलिस स्थानकाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
"वेन्याद जिल्ह्याच्या काही भागात माओवादी कारवाय केंद्रीभूत झाल्याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली असून त्या निपटून काढण्यासाठी पोलिस आवश्यकत्या उपाययोजना करत आहेत. सध्यातरी या भागात माओवादी कारवायांचा धोका नसला सावधानता बाळगणे गरजेचे आहे,'' असे ते म्हणाले.
बिहारमध्ये माओवाद्यांविरूद्ध उघडण्यात आलेली मोहिम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे पिल्लई यांनी स्पष्ट केले.
Follow
Us on
Twitter