Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

रिझर्व्ह बॅंक गव्हर्नरांचा पगार सव्वा लाख
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई  -  दोनच महिन्यांपूर्वी खासगी बॅंकप्रमुखांच्या गलेलठ्ठ पगारावर आक्षेप घेणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांना यंदाच्या जूनमध्ये सव्वा लाख रुपये वेतन मिळाले असून, राष्ट्रीयीकृत बॅंकप्रमुखांनीही यापेक्षा अधिक वेतन या कालावधीत उचलले आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी जुलैमध्ये खासगी बॅंकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी; तसेच संचालक यांच्या वेतनावर आक्षेप घेत बिकट वित्तीय स्थितीत 10 ते 15 टक्के कमी वेतन घ्यावे, असेही सुचवले होते. माहितीच्या अधिकार कायद्यानुसार रिझर्व्ह बॅंकेकडूनच मिळालेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या जूनमध्ये त्यांनी 1 लाख 28 हजार 500 रुपये पगार घेतला होता. म्हणजेच सुब्बराव यांचे एका वर्षातील वेतन 15 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.
त्यांच्या वेतनाच्या तुलनेत मध्यवर्ती बॅंकेच्या चार डेप्युटी गव्हर्नरांना प्रत्येकी एक लाख 15 हजार 500 रुपये महिना वेतन आहे, तर सात कार्यकारी संचालकांना जूनमध्ये प्रत्येकी 90 हजार 271 रुपये वेतन अदा करण्यात आले आहेत.

रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांपेक्षा राष्ट्रीयीकृत क्षेत्रातील; तसेच खासगी क्षेत्रातील बॅंकप्रमुख यांचे वेतन अधिक आहे. देशातील पहिल्या क्रमांकाच्या भारतीय स्टेट बॅंक या राष्ट्रीयकृत क्षेत्रातील बॅंकेचे प्रमुख ओ. पी. भट यांनी एप्रिल 2009 ते मार्च 2010 या संपूर्ण आर्थिक वर्षात वेतनापोटी 26 लाख 50 हजार रुपये घेतले आहेत.

खासगी क्षेत्रातील 14 मोठ्या अधिकाऱ्यांनी मार्च 2010 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी रुपयांहून अधिक वेतन घेतले आहे. खासगी क्षेत्रातील "नंबर वन' बॅंक असणाऱ्या आयसीआयसीआय बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांचे वार्षिक "पॅकेज' 2 कोटी 8 लाख रुपये राहिले आहे, तर दुसऱ्या कट्टर स्पर्धक एचडीएफसी बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांचे गेल्या वर्षातील वेतन यापेक्षा अधिक सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये होते. खासगी ऍक्‍सिस बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा यांनी 1 कोटी 52 लाख रुपयांचे वेतन गेल्या आर्थिक वर्षात घेतले होते, तर याच क्षेत्रातील कोटक महिंद्रा बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनी 1 कोटी 13 लाख रुपये आणि येस बॅंकेचे प्रमुख राणा कपूर यांनी 1 कोटी 28 लाख रुपयांचे वेतन गेल्या आर्थिक वर्षात घेतले आहे.

बॅंकप्रमुखांचे 2009-10 मधील पगार :
डी. सुब्बाराव : 15 लाख रुपये
ओ. पी. भट : 26 लाख 50 हजार रुपये
आदित्य पुरी : 3 कोटी 40 लाख रुपये
चंदा कोचर : 2 कोटी 8 लाख रुपये
शिखा शर्मा : 1 कोटी 52 लाख रुपये
प्रतिक्रिया
On 9/6/2010 10:11 PM vikas said:
कुणाच्याही पगाराची अशी जाहीर चर्चा करू नये...
On 9/6/2010 1:18 PM Jagdish said:
खूपच कमी पगार आहे डी. सुब्बाराव ह्यांना.
On 9/6/2010 12:34 PM kulkarni said:
खरेच जेवढी ह्यांची जबाबदारी आहे त्यपेक्ष खूपच कमी आहे पगार...
On 06/09/2010 9:40 AM Abhishek said:
This news is just bullshit We should understand that Subbarao is heading Reserv Bank not a private company it is a most criticle orgnization in our country he deservs this amount of salary
On 9/6/2010 8:40 AM sasonkar yardena israel said:
फारच कमी पगार आहे--
On 9/6/2010 8:26 AM Dr. Snehal Tawde said:
बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना चांगला पगार दिला तर बँक उत्तम चालेल असे गृहीत धरले जाते. वास्तविक रित्या पगाराची फक्त चर्चा करण्यापेक्ष्या बँकेचा कारभार आणि नफा कसा आहे हेसुद्धा जनतेच्या समोर आणले पाहिजे. राष्ट्रीयकृत बँकेने जनतेला बचत ठेवीवर अत्याधिक उत्पन्न आणि कर्ज उपलब्धी आणि कमीत कमी व्याज दिले पाहिजे तरच देशाची अर्थव्यवस्था सुध्रुड राहील. जर बँकेचा कारभार आणि उत्पन्न उत्तम असेल तर प्रमुख अधिकाऱ्याचा पगार चांगलाच असला पाहिजे. पत्रकाराने आणि जनतेने हे समजून घेतले पाहिजे.
On 9/6/2010 12:48 AM shirish said:
बर झालं ! आता आपले माननीय खासदार त्यांचे वेतन त्यापेक्षा १ रुपयाने वाढवून मागायला मोकळे !!


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: