Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

दुहेरीत सानिया पेसची सहकारी
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 12:15 AM (IST)

नवी दिल्ली - भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू लिअँडर पेस राजधानी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिश्र दुहेरीत सानिया मिर्झाच्या साथीत खेळेल.

मिश्र दुहेरीत सानिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महेश भूपतीच्या साथीत खेळते. मात्र, राष्ट्रकुलसाठी संघ रचना पाठविण्यासाठी तीन सप्टेंबरची मर्यादा ठेवण्यात आल्याने भारतीय टेनिस महासंघाने एटीपी मानांकनानुसार निर्णय घेतल्याचा दावा केला.

पेस आणि त्याचा एकवेळचा साथीदार महेश भूपती यांच्या एटीपी मानांकनात अगदी थोडासा फरक आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे खूप कठीण असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले. भूपतीने सानियाच्या साथीत 2009मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली होती. पेसने सानियाच्या साथीत 2006 दोहा आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते.

नव्या क्रमवारीत दुहेरीत पेस सहाव्या, तर भूपती सातव्या स्थानावर आहेत. या एकाच अंतराच्या फरकाने सानियाच्या साथीदाराचा निर्णय घेण्यात आला.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 2:38 PM Mahavir said:
सानिया पेसची सहकारी.................वा ! वा ! भारती सहकारी आवडला वाटते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: