Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

नगरजवळ जातीय दंगलीत ११ जण जखमी
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 08:49 PM (IST)

राशीन (नगर) - सरपंच निवडीस विरोध केल्याच्या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करीत, बाभूळगाव दुमाला येथील दलित समाजाच्या १० ते ११ जणांवर बाजार समितीचे संचालक बिभीषण गायकवाड व इतर साठ जणांच्या टोळक्‍याने शस्त्रांसह प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेले अक्षरशः रक्तबंबाळ झाले. यामध्ये काही जणांचे हात-पाय मोडले. डोक्‍यात घाव बसल्याने तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. दहा जणांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.

या घटनेमध्ये जखमी झालेल्यांची नावे अशी ः बाळासाहेब चव्हाण, प्रशांत चव्हाण, अनिल चव्हाण, दीपक कांबळे, रमेश चव्हाण, शरद खराडे, आबासाहेब खराडे, वाळू चव्हाण.

राशीन पोलिसांत बिभीषण गायकवाड यांच्यासह साठ जणांवर अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांन्वये, तसेच विनयभंग, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमवून दंगल घडविणे, घरात घुसून प्राणघातक शस्त्रांसह हल्ला करणे, असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबतच्या फिर्यादीत म्हटले आहे, की बिभीषण गायकवाड व इतर साठ जणांनी, "आमचा सरपंच झाला नाही, यांना गावात राहू द्यायचे नाही. यांना मारा, आपल्याला आमदार प्रा. राम शिंदे यांचा पाठिंबा आहे, असे म्हणत सकाळी साडेसहाच्या दरम्यान गज, कोयते, कुऱ्हाड, काठ्या, तलवार अशा हत्यारांसह हल्ला चढविला. घरात घुसून भेटेल त्यांना मारहाण केली. तसेच, आरोपी मारुती विठोबा गायकवाड याने एका महिलेचा विनयभंग केला. गायकवाड याने दलित महिलांना नग्न करून मारू, अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

या हल्ल्यात जखमी झालेल्या काही जणांवर राशीनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व कर्जत येथील जिल्हा उपरुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक विजय कोहक, पोलिस उपनिरीक्षक अण्णासाहेब घावटे यांनी बाभूळगाव दुमाला येथे भेट दिली. या घटनेचा प्रमुख सूत्रधार गायकवाड व विजय मोहिते यांना ताबडतोब अटक केली. इतर आरोपी पळून गेले.

या घटनेत जखमी झालेल्या व गंभीर स्थितीत असलेल्या बाळासाहेब चव्हाण, प्रशांत चव्हाण, शरद खराडे, आबासाहेब खराडे, अशोक चव्हाण, बापूराव चव्हाण, दीपक कांबळे, परशुराम चव्हाण, जगन्नाथ चव्हाण यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
On 9/6/2010 9:05 PM sandip borade said:
MR BIBHISHAN GAIKWAD SHOULD BE SENTENCED TO DEATH IMMEDIATELY AND THE OTHERS SHOULD BE SENT TO JAIL FOR 25 YEARS AT LEAST. THEY ARE VERY CASTIEST AND THE ADMINSTRATION SHOULD TAKE IMMEDIATE ACTION ON THE MATTER.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: