ईद, गणेशोत्सवादरम्यान घातपाताची शक्यता
सकाळ वृत्तसेवा
Monday, September 06, 2010 AT 03:59 PM (IST)
मुंबई - ऐन सणासुदीच्या म्हणजेच गणेशोत्सव आणि ईदच्या काळात महाराष्ट्रात घातपात घडविण्याचा कट लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनेने यांनी रचला आहे. पुण्या- मुंबईसारखी शहरे या संघटनेची लक्ष्ये असल्याची माहिती गुप्तचर संघटनेने महाराष्ट्र पोलिसांना दिली आहे. त्याबाबतचा अहवालही गुप्तचर संघटनेने दिला आहे.
या अहवालामुळे राज्य शासनाचे धाबे दणाणले असून, महाराष्ट्र पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस खात्याकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
दहशतवादी कारवायांसाठी कार बॉंब, बाईक बॉंबचा वापर होऊ शकतो, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे बॉम्बस्फोट घडवून आणले जाऊ शकतात, असेही त्यात म्हटले आहे.