Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

माळरानाला चढणार हिरवाईचा साज ( फोटो फीचर)
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:59 AM (IST)
रोपळे बुद्रूक - वर्षानुवर्षे ओसाड माळरान असलेल्या मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील वनक्षेत्रावर "सकाळ' माध्यम समूह व येथील न्यू इंग्लिश स्कूलतर्फे "हरित सोलापूर' अभियातून विविध प्रकारच्या फळा-फुलांच्या साडेसहा हजार वृक्षांची लागवड आज करण्यात आली आणि ओसाड माळरानाला हिरवाईचा एक वेगळाच साज मिळाला. लावण्यात आलेली रोपं मोठी होईपर्यंत त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी येथील विद्यार्थ्यांनी घेतली. 

वन विभाग, सामाजिक वनीकरण व रोपळे बुद्रूक ग्रामस्थांच्या सहकार्याने वनमहोत्सव व हरित सोलापूर या उपक्रमाअंतर्गत आज वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. "सकाळ' माध्यम समूह व न्यू इंग्लिश स्कूलने त्यामध्ये पुढाकार घेतला. 

वृक्षलागवड मोहिमेत सहभागी होण्यासाठी सकाळी नऊ वाजता रोपं लावण्यासाठी खुरपे, फावडे, टिकाव घेऊन सर्व विद्यार्थी माळरानावरील वनक्षेत्रावर जमा झाले. रोपांची पूजा, वृक्षसंवर्धनाची शपथ घेऊन विद्यार्थी रोपं लावण्यासाठी सरसावले. आठशे विद्यार्थ्यांनी दिवसभरात साडेसहा हजार रोपं लावली. रोपांच्या अवतीभोवती बसून दुपारच्या मधल्या सुटीत घरातून आणलेला डबा खाऊन विद्यार्थी व शिक्षकांनी वनभोजनाचा आनंद लुटला.

यावेळी विद्यार्थ्यांनी "सकाळ मित्र ग्लोबल शिवाराचा' झाडे लावा झाडे जगवा, वनश्री हीच धनश्री, "सकाळ' घेऊ झाडे लावू अशा घोषणा देऊन सर्वांचे लक्ष वेधले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला बातमीदार मोहन काळे यांनी सर्वांचे स्वागत केले.

"सकाळ'चे सहयोगी संपादक दयानंद माने अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद होनराव, सामाजिक वनीकरणाचे सहायक संचालक अशोक शेंडगे, उपसंपादक अभय जोशी, विनोद कामतकर, वनक्षेत्रपाल एम. एस. बोकफोडे, लागवड अधिकारी एस. व्ही. जाधव, सहायक माहिती अधिकारी डी. जी. खाडे, विभागीय कृषी अधिकारी ए. आर. डुबल, तालुका कृषी अधिकारी अंकुश चोपडे, कला व्हिडिओचे शशी भोसले, श्रेयश स्टुडिओचे विलास साळुंखे उपस्थित होते. तसेच मोडनिंब येथील समर्थ हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत कोल्हे, माजी सरपंच दिनकर कदम, संभाजी पवार, स्थानिक स्कूल समितीचे शिवाजी पाटील, गणेश गायकवाड, अर्जुन गायकवाड, संजय रितोंड, विलास (ल.) भोसले, सचिन माने, संयुक्त वन समितीचे अध्यक्ष नामदेव पवार आदी ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेऊन खारीचा वाटा उचलला.

मान्यवरांच्या हस्ते आज सोमवारचे औचित्य साधून बेलाच्या झाडाची रोपे लावून वृक्षलागवडीला प्रारंभ केला. प्रास्ताविकात मुख्याध्यापक एम. जे. चौधरी यांनी "सकाळ' माध्यम समूहाची आमच्या पाठीवर कायमच थाप पडत असते. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमात सहभाग घेऊन रोपांचे चांगले संवर्धन करणार असल्याचे सांगितले.

पर्यवेक्षक पी. डी. यादव, वैशाली व्यवहारे, कुमार सुरवसे, आर. एल. कोरे, डी. डी. गाडवे, एम. एम. शिवशरण, एच. एस. केंदुळे, एम. डी. गायकवाड, व्ही. पी. हिरके, एम. व्ही. थिटे, पी. एन. झेंडे, आर. एल. पवार, आर. सी. मांडरे, ए. ए. भोसले, पी. एस. कोळेकर, ए. जी. पवार, व्ही. एस. अजगरे, डी. एम. कदम आदी शिक्षक व वनपाल एम. एम. स्वामी, वनरक्षक एच. आर. फुले, वन मजूर डी. यु. मुलाणी, पी. बी. उबाळे, बी. व्ही. पवार, बी. व्ही. पाटील यांचेही सहकार्य मिळाले. कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.

साडे सहा हजार रोपांची लागवड
विद्यार्थ्यांनी सोमवारी मेंढापूरच्या माळरानावर लावलेल्या साडेसहा हजार रोपांमध्ये प्रामुख्याने बेल, कडुनिंब, चिंच, खैर, अशोक, बाभूळ, वड, जांभूळ, जंगली तरवड आदी झाडांचा समावेश आहे.







फोटो गॅलरी

प्रतिक्रिया
On 21/10/2011 09:53 PM amol jadhav said:
मस्त काम आहे मला शब्द नाहीत? उद्या २२/१०/२०११ मी आणि माझी संस्था ग्रीन वल्ड फाउंडेशन बारामती २५० झाडे लावत आहे सर्पमित्र अमोल बारामती - ९८६०५०४०७६
On 21/10/2011 09:44 PM oswal sandeep said:
वेरी गुड वोर्क सगळ्याने प्रयत्न केला पाहिजे, तिखट प्रतिक्रिया देण्यापेक्षा सगळ्यांनी काम करून झाडांचे संघोपण केले पाहिजे .
On 9/7/2010 11:04 PM बाजीराव पाटील said:
झाले एकदाचे फोटो तर पेपर मध्ये आले. फक्त टीका म्हणून नाही, पण... यापुढे किती झाडे वाचतील हा मोठा प्रश्न आहे, कारण माझ्या खेडेगावी सामाजिक वनीकरण अभियानातर्फे झाडे लावली होती. त्या ठिकाणी आता एकही झाड दिसत नाही. आम जनतेला झाडाचे महत्व कळले तरच झाडे वाचतील.
On 9/7/2010 1:27 PM tushar said:
सुंदर अशा प्रकारे सर्वेजन काम करतील अशी अपेक्षा आहे. तुमच्या या कार्यामुळे सर्वांना फायदा होईल,
On 9/7/2010 1:04 PM Asif Parkar said:
चांगले काम केलाय असेच सर्वाने काम करावे आणि झाडे लावावीत आणि संपूर्ण देश हिरवे गार करावे.
On 9/7/2010 12:24 PM kiran nehulkar said:
त्या झाडांचे आजचे फोटो दाखवा.... कारण आज ती झाडे शेळीने खाऊन टाकली असेल.
On 9/7/2010 11:11 AM S.B. Morankar said:
Conservation of tree is most important.
On 07-09-2010 11:08:50 अरविंद भोसले said:
आमचे जुने दिवस आठवले.. आम्ही असेच जात होतो कोट्लिंग च्या डोंगरावर.. बरीच झाडे लावली.. जर शनिवारी हातात टिकाव आणि खोरे.. कोट्लिंग विकास प्रकल्प (डोंगरवाडी) , - भारतमाता विद्यालय चिकुर्डे. - सांगली जिल्हा.
On 9/7/2010 10:41 AM Snehal Parkhi said:
अतिशय सुंदर उपक्रम आहे. माझ्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
On 07/09/2010 10:40 vikas k said:
झाडे मिर्गाला लावावी तर जगतात नाहीतर पुढील महिन्यात मारतील काही उपयोग नाही सर्व मेहनत वाया
On 9/7/2010 10:25 AM kalgidhar Englsih Medium School said:
आम्ही तुमच्या प्रोजेक्टला इंटरनेट वर भेट दिली. आमचा वर्ग ईयत्ता ६ वी आहे.आम्हालाही आपल्या प्रोजेक्टविषयी उत्सुकता वाटली आम्हाला फार आनंद वाटला आम्हीही तुमाच्यासाराखा प्रोजेक्ट राबू आमच्या शाळेत.
On 9/7/2010 9:31 AM chaitali said:
खूप चं छान काम केल आहे. चला आपणही ठीक ठिकाणी झाडे लावूयात. गणपतीच्या उत्सवात काहीतरी वेगळ करून दाखवूयात. झाडे लावा झाडे जगवा .
On 9/7/2010 9:04 AM ashok said:
उत्तम उपक्रम, धन्यवाद तर दिलेच पाहीजेत, जितकी झाडे तितक्याच लोकांची नावे बातमी मद्घ्ये दिसतात ,येण केण प्रकारेण आपले नाव पेपरात यावे।
On 9/7/2010 8:47 AM rahul said:
स्तुत्य उपक्रम..
On 9/7/2010 8:31 AM Vidyadhar Gokhale said:
अतिशय स्तुत्य उपक्रम.सर्वांनी सहभागी व्हाव असा.सकाळचे मनःपूर्वक अभिनान्न्दन.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2011 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: