Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

रमजानमध्ये प्रथमच बिग बॅनर्सचे चित्रपट पडद्यावर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: film,   bollywood,   mumbai

संतोष भिंगार्डे - सकाळ वृत्तसेवा
मुंबई - रमजानच्या महिन्यात मुस्लिम प्रेक्षकवर्ग मिळत नसल्यामुळे "बिग बॅनर्स'चे चित्रपट या कालावधीत प्रदर्शित होत नव्हते. या दिवसांत मोठमोठ्या पार्ट्याही झडत नव्हत्या, परंतु या वर्षी ही परंपरा खंडित झाली आहे. "पीपली लाईव्ह', "आशाएं', "लफंगे परिंदे', "वुई आर फॅमिली' हे चित्रपट या कालावधीत प्रदर्शित झाले आहेत. त्यापैकी "पीपली लाईव्ह' या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला आहे; तर "डबल धमाल' या चित्रपटाचा मुहूर्त झाला आहे.

खरे तर उत्तर भारतात तसेच मुंबईतील काही भागांत मुस्लिम बांधवांची संख्या जास्त आहे. हिंदी चित्रपटांचा तो हुकमी प्रेक्षकवर्ग आहे. रमजानच्या दिवसात हा प्रेक्षकवर्ग रोजा ठेवत असल्यामुळे चित्रपटगृहात येत नाही. साहजिकच त्याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर होतो. त्यामुळे या कालावधीत कोणताही मोठा निर्माता-दिग्दर्शक आपला चित्रपट लावण्यास धजावत नसे किंवा चित्रपटाच्या मोठ्या पार्ट्याही या कालावधीत होत नसत, परंतु यंदाच्या रमजानमधील चित्र नेमके उलटे दिसत आहे. करण जोहरचा "वुई आर फॅमिली', सुभाष घई यांचा "हॅलो डार्लिंग', यशराज बॅनर्सचा "लफंगे परिंदे', आमीर खान प्रॉडक्‍शनचा "पीपली लाईव्ह' अशा काही बिग बॅनर्सच्या चित्रपटांसह छोट्या बॅनर्सचे चित्रपटही बरेच आले. त्यापैकी "पीपली लाईव्ह'ने उत्तम व्यवसाय केला असून अन्य चित्रपटांनी काही भागांत बऱ्यापैकी यश मिळविले आहे. शिवाय, इंद्रकुमार यांच्या "डबल धमाल' या चित्रपटाचा मुहूर्तदेखील मोठ्या धूमधडाक्‍यात याच दिवसांत झाला. तसेच रमजानच्या दिवसांतच पंचतारांकित हॉटेलात जंगी पार्ट्याही झाल्या. त्यामध्ये दोन भव्य असे फॅशन शो, "रामायण-द एपिक' या ऍनिमेशनपटाचा फर्स्ट लूक, "फ्रायडे मूव्हीज'ची पार्टी असे काही धमाकेदार "सेलिब्रेशन' झाले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: