मध्य, पूर्व विदर्भात पाऊस पुन्हा सक्रिय
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 03:30 PM (IST)
नागपूर - मध्य आणि पूर्व विदर्भात आज (मंगळवार) सकाळपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. अकोला, बुलडाणा, वाशीम आणि गडचिरोली येथे ढगाळी वातावरण असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे गावतलाव फुटून शेकडो घरांमध्ये पाणी शिरले. सुदैवाने जीवित हानी नाही, मात्र मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक घरांची पडझड झाली. तर लाखो रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.