Viva Swaraj
Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जहाजविरोधी क्षेपणास्त्र चीनकडून लवकरच तैनात
पीटीआय
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: misile,   chin,   bijing,   international

बीजिंग - चीनने बनविलेले महत्त्वाकांक्षी जहाजविरोधी क्षेपणास्त्र लवकरच तैनात केले जाण्याची शक्‍यता आहे. प्रशांत महासागरातील अमेरिकी नौदलाच्या प्रभावास रोखण्याचा हेतू यामागे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचा पल्ला तब्बल वीस हजार किलोमीटरचा आहे.

मागील आठवड्यातच अमेरिकेचे प्रशांत क्षेत्राचे नौदल कमांडर ऍडमिरल रॉबर्ट विल्लार्ड यांनी जहाजविरोधी क्षेपणास्त्र लवकरच चीन तैनात करेल, असे सूचित केले होते. त्यापाठोपाठ चिनी सरकारचे मुखपत्र असलेले "ग्लोबल टाइम्स'ने तैनातीचे वृत्त दिले आहे. ""चीनच्या क्षमतेवर अविश्‍वास दाखविणाऱ्यांना ताकद दाखविणे गरजेचेच आहे,'' अशी टिप्पणीही या वृत्तात आहे.

अमेरिकी संरक्षण तज्ज्ञांच्या मते, हे क्षेपणास्त्र "डोंगफेंग 21' या चिनी क्षेपणास्त्राची नवी आवृत्ती आहे. अमेरिकी लढाऊ जहाजांचे संरक्षण भेदण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात असेल. वीस हजार किलोमीटरच्या पल्ल्यामुळे चिनी सागरी हद्दीच्या पलीकडीलही लक्ष्यभेद करता येणार आहे. एवढेच नव्हे तर वादग्रस्त ठरलेला संपूर्ण दक्षिण चीन समुद्र टप्प्यात येणार आहे.
प्रतिक्रिया
On 31/03/2011 08:25 PM sagar tamhankar said:
हि तर युद्ध्ची भाषा आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: