चांदी 32 हजारांकडे; सोने पुन्हा 19 हजारांवर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:30 AM (IST)
मुंबई - चांदी या धातूची विक्रमी दराकडे आगेकूच सुरूच असून चांदी आज किलोमागे सुमारे 110 रुपयांनी वधारली. यामुळे मुंबई सराफा बाजारात आज चांदीने विक्रमी 31 हजार 800 रुपयांचा भाव मिळवला. सोन्याबरोबरच चांदीच्या खरेदीचेही प्रमाण वाढल्याने चांदी आता 32 हजाराच्या नजीक जाऊन पोहोचली आहे; तर सोन्याच्या दरात आज तोळ्यामागे किरकोळ वाढ झाली. स्टॅन्डर्ड आणि शुद्ध सोने दर आज दहा ग्रॅममागे प्रत्येकी 5 आणि 15 रुपयांनी वधारले. यामुळे सोने तोळ्यासाठी पुन्हा 19 हजारांच्या घरात पोहोचले आहे.