Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बॅंकांना गरज 5 लाख कर्मचाऱ्यांची
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: bank,   mumbai,   business

मुंबई - येणारे नवे दशक हे आर्थिक सर्वसमावेषकतेच्या दृष्टीने देशातील बॅंकांसाठी आव्हानात्मक असल्याचे दर्शवून, या कालावधीत या क्षेत्रात सुमारे 5 लाख कर्मचारी - अधिकाऱ्यांची गरज असेल, असा निष्कर्ष एका अहवालात काढण्यात आला आहे.

'फिक्की' या उद्योजक संघटनेच्या वतीने मुंबईत उद्यापासून (ता.7) तीन दिवसांची परिषद होत आहे. 'इंडियन बॅंकिंग - 2020' या विषयावरील या परिषदेत भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज येथे जारी करण्यात आलेल्या अहवालात बॅंक क्षेत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. 'बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप' आणि बॅंक व्यवस्थापकांची संघटना असलेल्या 'इंडियन बॅंक्‍स असोसिएशन' यांच्या संयुक्त विद्यमाने जारी करण्यात आलेल्या या अहवालात आर्थिक सर्वसमावेषकता आणि मनुष्यबळ या मुद्द्यांना अधोरेखित करण्यात आले आहे.

मध्य आणि वरिष्ठ पदावरील कर्मचारी नजीकच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात निवृत्त होत असल्याने या क्षेत्रात मनुष्यबळाची मोठी गरज भासणार असून, येत्या दशकभरातील ही संख्या 5 ते 6 लाखांच्या घरात असेल, असे 'बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप'चे संचालक सौरभ त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

'मॅकेन्झी' या अन्य एका सर्वेक्षण संस्थेनुसार, देशभरातील 27 राष्ट्रीयीकृत, 18 विदेशी, 26 खासगी, 82 विभागीय ग्रामीण आणि 1,751 सहकारी बॅंकांमध्ये 2009 अखेर 9 लाख 41 हजार 375 कर्मचारी आहेत. गेल्या दशकभरात बॅंक कर्मचाऱ्यांची संख्या अवघ्या 0.2 टक्‍क्‍यांनी वाढली आहे.
प्रतिक्रिया
On 9/8/2010 5:00 PM dhanraj said:
incresaed jobs than effect 2020 "MAHASATA"INDIA good news thans sakal
On 9/8/2010 4:14 PM sangeeta said:
बँक ज्या परीक्षा घेतात त्याचे पुढे काय होते? त्या परीक्षांचा निकाल सुद्धा पेपर मध्ये जाहीर करावा आणि select झालेल्या candidates ची लिस्ट जाहीर करवी.
On 9/8/2010 1:52 AM Santosh Shinde said:
भविष्य काळ उज्ज्वल आहे म्हणायचा तर!
On 9/7/2010 5:59 PM vishwanath gokhale said:
खरतर कार्मार्चारी भारती कधीच वाहायला हवी होती आपल्या देशात जर एवढी बेरोजगारी असताना केली असती तर लोकांचे कल्याण झाले आस्ते आणी बँकेत अनुबह्वी लोक तयार झाले आस्ते.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: