Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेत टपाल तिकीट
पीटीआय
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)

वॉशिंग्टन - मानवतेचा वसा घेऊन पाच दशके समाजसेवा करणाऱ्या मदर तेरेसा यांच्या सन्मानार्थ अमेरिकेने त्यांच्यावर टपाल तिकीट काढले आहे. बासिलका येथे रविवारी या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

मदर तेरेसा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भारताने त्यांच्यावर नुकतेच पाच रुपयांचे नाणे काढले आहे. अमेरिकेनेही मदर तेरेसा यांच्या समाजसेवेच्या गौरवार्थ टपाल तिकीट काढले असून त्याची किंमत 44 सेंट आहे. यूएस पोस्टल सर्व्हिसच्या वतीने काढण्यात आलेल्या टपाल तिकिटावर प्रसिद्ध चित्रकार थॉमस ब्लॅकशेयर, दुसरे यांनी रेखाटलेले तेरेसा यांचे चित्र आहे. प्रकाशन सोहळ्यास ब्लॅकशेयरही उपस्थित होते.

या प्रसंगी पोस्टमास्तर जनरल जॉन पॉटर म्हणाले की, साधारणतः तिकिटांना देशाचे "कॉलिंग कार्ड' मानले जाते. कारण ते स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय लोकांपर्यंत पोचत असते. 1996 साली तेरेसा यांना अमेरिकेचे सन्माननीय नागरिकत्व बहाल केल्यानंतर आज त्यांच्यावर टपाल तिकीट काढणे ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब होय.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: