Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

साध्वी प्रज्ञासिंगला हवेत आयुर्वेदिक उपचार
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:15 AM (IST)

मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरला आता पोदार रुग्णालयात आयुर्वेदिक उपचार घ्यायचे आहेत. यासाठी आज विशेष मोक्का न्यायालयात साध्वीने यासंबंधी अर्ज दाखल केला.

साध्वी प्रज्ञासिंगला सध्या छातीमध्ये निर्माण झालेल्या गाठींमुळे आजार झाला आहे. मागील कित्येक महिन्यांपासून ती नाशिकमधील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेत होती; मात्र या गाठींबाबत बायोप्सी करण्यासाठी जे. जे. शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंगला मुंबईत आणण्यात आले आहे. आता तिचे म्हणणे आहे, की आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये उपचार घेतले असल्यामुळे त्याच प्रकारचे उपचार पुन्हा सुरू करण्यासाठी वरळीतील पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात दाखल करावे. न्यायालयाने याबाबत जे. जे. रुग्णालयाचा अहवाल मागितला आहे. साध्वी प्रज्ञासिंग सध्या जे.जे.मध्येच उपचार घेत आहे. यापूर्वी दोन वेळा तिच्यावर बायोप्सी करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
On 9/8/2010 5:53 PM sagar kariya said:
Every prisoner in India getting these facility so why not to HER
On 07/09/2010 15:59 Abhijit said:
न काळात तुम्ही साध्वीना अतिरेकी ठरून टाकले? कसाब आणि साध्वी ची तुलना करू नका. एकाला न्याय होऊन शिक्षा झाली आहे आणि एक प्रकरण कोर्टात आहे.
On 07/09/2010 10:31 pradeep said:
कसाब जर बिर्याणी मागू शकतो .. तर यांना की हरकत आहे उपचार घेईची ??
On 9/7/2010 8:10 AM Nikhil Mane said:
माधवीचे मागणे अगदी योग्य आहे. हे सरकार कसब सारख्या नराधमाला जर चमचमीत मटण देवू शकते तर साध्वीची हि मागणी अगदी साधी आहे.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: