Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

संतप्त प्रवाशांनी दौंड स्थानकात रेल्वे रोखली
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 09:25 AM (IST)
Tags: train,   railway,   daund,   passenger,   pune

पुणे - दौंड- पुणे शटल रेल्वेला सातत्याने उशीर होत असल्याने प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेत आज (मंगळवार) सकाळी या मार्गावरील रेल्वे सेवा बंद पाडली.

सकाळी पावणेसहा वाजता आलेली दौंड- पुणे ही शटल रेल्वे संतप्त प्रवाशांनी दौंड रेल्वे स्थानकामध्ये रोखून धरली. परिणामी दौंड- मुंबई आणि पुणे- दौंड रेल्वे सेवा ठप्प झाली. आतापर्यंत दौंड रेल्वे स्थानकाजवळ सहा रेल्वे गाड्या अडकून पडल्या आहेत. त्याचा फटका रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या उरुळी, हडपसर, लोणी, यवत, केडगाव येथील प्रवाशांना बसला आहे. सरकारी कर्मचारी, दूधवाले, भाजीवाले आणि विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे.

प्रवासी कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसून, शटलच्या काचादेखील फोडल्या आहेत. ही रेल्वे आज सलग दुसऱ्या दिवशी उशिरा आली आहे, अशी त्यांची तक्रार आहे. रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी सध्या रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. मात्र, अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
प्रतिक्रिया
On 9/7/2010 9:16 PM avinash said:
गाडी उशिरा आल्याने प्रवाशांचा उद्रेक अटळ आहे.रेल्वेने भविष्यात हे टाळणे गरजेचे आहे.
On 9/7/2010 9:11 PM prashant said:
मी दौन्डचा आहे.
On 07/09/2010 10:29 pradeep said:
लोकहो .. कृपया त्या बिचाऱ्या गाडी चे नुकसान करू नका .. आपल्याच करांच्या मधून परत दुरुस्त होतात .. त्या पेक्ष्या त्या लोकांना धरून बडवा ज्यांच्या मुले हलगर्जी पन्ना होतो आणि गाडी उशिरा येते... त्यांना रट्टे दिले पाहिजेत ..
On 7/09/2010 9:43 AM jay said:
तसच पाहिजे अगदी बरोब्बर केलेत मी तुमच्या पाठीशी आहे


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: