Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'अक्षरधाम' हल्लेखारांच्या शिक्षेला स्थगिती
पीटीआय
Tuesday, September 07, 2010 AT 12:00 AM (IST)

नवी दिल्ली - गुजरातमधील अक्षरधाम मंदिरावर 2002मध्ये हल्ला केल्याप्रकरणी दोघा दहशतवाद्यांना उच्च न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

आदनभाई सुलेमान आणि अब्दुल कय्यूम मुफ्ती या दोघा दहशतवाद्यांना अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी विशेष "पोटा' न्यायालयाने 2006मध्ये दोषी ठरविले होते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. उच्च न्यायालयानेही या वर्षी जूनमध्ये ही शिक्षा कायम ठेवली होती. दोघा दहशतवाद्यांनी फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सुलेमान व मुफ्ती यांच्या अर्जावर सुनावणीच्या वेळी न्या. बी. सुदर्शन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग आणि गुजरात सरकारला नोटिसा बजावल्या असून, उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

अहमदाबादमधील अक्षरधाम मंदिरावर 24 सप्टेंबर 2002 रोजी लष्करे तैयबाच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 37 जणांचे प्राण गेले होते.
प्रतिक्रिया
On 9/7/2010 9:15 AM purushottam said:
का यांना जिवंत ठेवले जाते तेच कळत नाही , ज्या लोकांनी ३७ निरपराधांची हत्त्या केली त्यांना का जिवंत ठेवल जातय . असल्या नराधमाना सर्वलोकान समोर फाशी द्या तरच अतेरीकीक्याना दुष्कृत्य करताना हजारवेळा विचार करावा लागेन


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: