Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

रमजानची सांगता, गणेशाचे आगमन (फोटो फिचर)
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 04:31 PM (IST)

भुसावळ - गणरायाचे आगमन आणि रमजान महिन्याची सांगता यामुळे यंदा राष्ट्रीय एकात्मता जोपासली जात आहे. एका पवित्र पर्वाची सांगता होत असतांनाच दुसऱ्या उत्सवाची सुरूवात होत आहे.

रमजान इदनिमित्त शहरातील विविध मशिदींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. हिंदू समाजात ज्याप्रमाणे दिवाळी सर्वात मोठी मानली जाते त्याच प्रमाणे मुस्लीम समाजात रमजान इदही जणू मुस्लीम बांधवांची दिवाळीच असते. रमजान ईद येत्या शुक्रवार अथवा शनिवारी होणार असल्याची शक्‍यता जाणकार वर्तवित आहे. यामुळे आतापासून मुस्लीम बांधव ईदनिमित्त खरेदीला लागले आहे. यामुळे बाजार चांगलाच गजबजला आहे. एकीकडे रमजान ईदची खरेदी तर दुसरीकडे गणरायाचे आगमन होणार असल्याने हिंदू बांधवांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात गणरायाच्या भव्य मुर्ती आणल्या जात आहे. गणरायाचे आगमन होणार असल्यामुळे बालगोपाळासह आबालवृध्दांमध्येही उत्साह जाणवत आहे. घरात गणरायाची स्थापना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आरास केली जात असते. यामुळे बाजारात थर्माकोलचे आकर्षक मंदीरे विक्रीस आली आहेत. यंदा रंगीत थर्माकोलचे विविध आरास करण्यासाठी नक्षिदार साहीत्य बाजारात विक्रीस आले आहे. यामुळे अनेक भाविकांचा कल हा थर्माकोलचे साहीत्य घेण्यावर आहे.

गणेश मुर्तीचे दुकाने सजली
शहरातील विविध भागात गेल्या आठ दिवसांपासून गणेशाच्या आकर्षक मुर्तीची विक्री करण्यासाठी दुकाने थाटली आहे. आकर्षक रंगसंगती असलेल्या या मुर्ती येणाऱ्या जाणाऱ्यांना मोहीत करून घेत आहे. अनेक भाविक आतापासूनच गणेशाच्या मुर्तीचे आरक्षण करून घेत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवसी होणारी गर्दी लक्षात घेता भाविक आतापासूनच आरक्षण करीत आहे. तसेच शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेशाची मुर्तीही वाजत गाजत कार्यकर्ते आणत आहे. रमजान ईद आणि गशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजार चांगलाच फुलला असून व्यावसायीकही ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.


भुसावळ - रमजान महिन्यातील इदनिमित्त शहरातील गौसिया मशिदीवर करण्यात आलेली आकर्षक रोषणाई रस्त्यावर पडलेल्या पाण्यातही खुलुन दिसत आहे. (सर्व छायाचित्रे - कालू शहा)
----------------------------------------------------------------------

भुसावळ - शहरातील सर्वात मोठी मशिद जमजल्या जाणाऱ्या जाम मोहल्ला मशिदही विद्युत रोषणाईने नटली आहे.
----------------------------------------------------------------------

भुसावळ - पंचशिलनगर मध्ये असलेल्या मदिना मशिदीवर केलेली रोषणाई.
----------------------------------------------------------------------

भुसावळ - जय गणेश फाउंडेशेनतर्फे आरास करण्यासाठी उभारण्यात येत असलेले भव्य शामियाना.
----------------------------------------------------------------------

भुसावळ - मातृभूमी गणेश मंडळातर्फे उभारण्यात येत असलेले व्यासपीठ.
----------------------------------------------------------------------

भुसावळ - जामनेर रोडवरील भवानी पेठेतील साई गणेश मंडळातर्फे आकर्षक करण्यात आलेले प्रवेशद्वार.
----------------------------------------------------------------------



आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: