Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

नाशिक विभागात सहा लाखांची वीजचोरी
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:17 AM (IST)

नाशिक - नाशिक परिमंडलातील मॉल्स, मल्टिप्लेक्‍स, हॉटेलसह मोठ्या व्यावसायिकांच्या वीजमीटरची तपासणी करताना वीज वितरण कंपनीने 13 ठिकाणी पाच लाख 92 हजारांच्या वीजचोऱ्या उघडकीस आल्याचे वीज कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.

वीज वितरण कंपनीने नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील मोठ्या वीजग्राहकांकडील मीटर तपासणीची मोहीम राबविली. त्यात नगर जिल्ह्यात 1967, नाशिक ग्रामीण 1944, तर नाशिक शहरात 4186 याप्रमाणे 8097 वीजमीटरची तपासणी करीत कंपनीने विजेचा वापर आणि त्यानुसार बिल आकारणी होते की नाही याची तपासणी केली. त्यात आठ मीटर बंद, 58 नादुरुस्त स्थितीत आढळल्याने ते त्वरित बदलले.
 
नाशिक शहरात सहा ठिकाणी एक लाख 43 हजार, नाशिक ग्रामीणमध्ये पाच ठिकाणी 51 हजार, तर नगर जिल्ह्यात दोन ठिकाणी तीन लाख 98 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली. त्यातील तीन ग्राहकांनी दंड व्याज व देयकाच्या एक लाख 41 हजारांचा भरणा केल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: