Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

'एसटी' बसमध्ये बायो डिझेलचा वापर
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 07, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: bio diesel,   st,   mumbai,   maharashtra

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बस गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बायो डिझेलच्या वापरामुळे प्रदूषणात 50 ते 60 टक्के घट होईल. तसेच महामंडळाची वार्षिक 15 कोटी रुपयांची बचत होईल, असा दावा महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.

कर्नाटक परिवहन सेवेच्या गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्यात येतो, त्याच धरतीवर एसटी महामंडळानेही बायो डिझेलच्या वापराचा निर्णय घेतला आहे. पुणे विभागातील दौंड एसटी आगारातील गाड्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर डिझेलमध्ये 20 टक्के बायो डिझेल मिसळण्यात आले. यामुळे इंधनावरील खर्चात प्रतिकिलोमीटर अंतरामागे 15 ते 20 पैशांची बचत होत असल्याचे आढळून आले. बसच्या इंजिनवरही कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे एसटी बसमध्ये बायो डिझेलचा वापर करण्याचा निर्णय महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी घेतला आहे. सुरवातीला ठाणे विभागातील वाडा आगारातील सर्व गाड्यांमध्ये बायो डिझेलचा वापर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यभरातील अन्य आगारात त्यांचा वापर सुरू होईल, असे सांगण्यात आले.
प्रतिक्रिया
On 9/7/2010 5:39 PM sharad said:
खूप छान निर्णय, आता बाकीचे वाहने वापर सुरे करतील.
On 9/7/2010 3:25 PM suresh topkar said:
असेच धाडशी निर्णय घ्या खूप चांगला फरक पडेल.
On 9/7/2010 11:17 AM Amit said:
अभिनंदन... खूप छान निर्णय


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: