Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

बजेटपूर्वी जाणणार समाजाचे मन - अर्थमंत्री
सकाळ वृत्तसेवा
Friday, September 10, 2010 AT 12:15 AM (IST)
अभय निकाळजे - सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - "राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यापूर्वी समाजातील उद्योगपती, अर्थतज्ज्ञ, विविध दैनिकांचे संपादक, प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, व्यापारी यांच्याशी चर्चा करून "पार्टिसिपेटरी बजेट' (सहभागवादी अर्थसंकल्प) तयार करण्यात येईल. त्यासाठी विभागवार बैठका घेऊन "समाजमन' जाणून घेतले जाणार आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात तरतुदी करण्याचे ठरविले आहे,'' अशी माहिती राज्याचे अर्थ आणि नियोजनमंत्री सुनील तटकरे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी गुरुवारी (ता. 9) श्री. तटकरे यांची भेट घेऊन अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा सहभाग राहावा यासंदर्भात काही सूचना केल्या. श्री. तटकरे यांनीही सहभागवादी अर्थसंकल्प करण्याची डॉ. गव्हाणे यांची कल्पना आवडल्याचे सांगितले.

""अर्थसंकल्पात लोकांचा सहभाग असावा, या दृष्टीने या बैठका महत्त्वाच्या ठरणार आहेत. या बैठकांमध्ये अर्थतज्ज्ञ, चार्टर्ड आकाउंटंट, उद्योजक, व्यापारी, प्रसार माध्यमांचे संपादक, विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक यांना आमंत्रित करून त्यांनी दिलेल्या सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यासाठी प्रयत्न करू,'' असे तटकरे म्हणाले.

श्री. तटकरे यांनी ""शासकीय यंत्रणेकडून राज्याच्या अर्थसंकल्पाचे लेखा परीक्षण होते, ते अतिशय तांत्रिक असते. त्यामुळे त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पाचे लेखापरीक्षण व्हावे, त्यातून प्रत्येक विभागाचा अर्थसंकल्पीय दृष्टिकोनातून क्रम लावता येईल, राज्यकर्त्यांना अपेक्षित असणाऱ्या योजना त्यांना अभिप्रेत असणाऱ्या समाजातील घटकांपर्यंत पोहचल्या आहेत किंवा नाहीत, हेही त्यातून समजेल,'' असे नमूद करून ""राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत समाजातील विविध घटकांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र अशा विभागवार एक दिवसीय बैठका विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ठेवून माहिती घेऊ,'' असेही सांगितले.

केंद्राप्रमाणे "जेंडर बजेटिंग' करणार
समाजातील दुर्बल आणि वंचित घटकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या प्रमुख स्वयंसेवी संस्था आणि महिलांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या संस्था व प्रमुख सामाजिक व सहकारातील कार्यकर्ते यांच्याशी अर्थसंकल्पापूर्वी चर्चा करणार आहे. केंद्राप्रमाणे "जेंडर बजेटिंग' करणार असल्याचेही श्री. तटकरे यांनी डॉ. गव्हाणे यांना सांगितले.
प्रतिक्रिया
On 9/10/2010 3:15 PM Punekar said:
प्रश्न सोडवण्याकडे प्रयत्न करावा. नुसते लिहून घेऊन प्रश्न सुटत नसतात,.
On 9/10/2010 3:13 PM SHIVRAM VAIDYA said:
अर्थमंत्री खूप लाडात आलेले दिसतात. बजेटमध्ये भाव वाढ करून परत वर्ष भर ती थोडी थोडी वाढवत नेण्याचा सराव असलेल्या अर्थमंत्र्यांना जनतेचे मन कळत असेल यावर विश्वास बसणे कठीण आहे. करदात्यांचा खिसा हलका करून, त्यांचा कष्टाचा पैसा लुटून, स्वतःच्या तुंबड्या भरणे एवढे एकच अर्थकारण माहीत असलेल्या अर्थमंत्र्याकडून आता बजेटमध्ये किती भाववाढ होते ते बघायचे. जनता आणि सरकार यामधील दरी वाढत चाललेली आहे हे मात्र निश्चित.
On 9/10/2010 7:13 AM Shitalkumar Kadam said:
सहभागवादि अर्थसंकल्पाची कल्पना निश्चित चांगली आहे.परंतु, एवढ्यावरच न थांबता केलेल्या खर्चाच्या "output " बाबतही नंतर चर्चा व्हावी.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: