Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

जनाची नाही तर मनाची तरी ठेवा!
सकाळ वृत्तसेवा
Sunday, September 26, 2010 AT 12:30 AM (IST)

नारायण राणे यांनी शिवसेनेला सुनावले

मुंबई  -  "चिंटू शेखची बाजू घेणारी शिवसेना आता पूर्णतः उघडी पडली आहे. केवळ सुडाच्या भावनेतून त्यांनी आपल्याविरुद्ध मोहीम उघडली असून, चिंटू शेखवरील कथित हल्ल्याचा बनाव निर्माण केला असल्याचे सिद्ध झाले आहे', असे स्पष्ट प्रतिपादन महसूल मंत्री नारायण राणे यांनी येथे केले. "जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज ठेवा', असे त्यांनी शिवसेनेला सुनावले.

शिवसेनेला राज्यातील कामगार, विद्यार्थी, कुपोषित किंवा अन्य गंभीर प्रश्‍नांसाठी मुख्यमंत्र्यांना आजपर्यंत भेटावेसे वाटले नाही; मात्र चिंटू शेखबद्दल शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना शनिवारी जाऊन भेटले आणि त्यांनी माझा राजीनामा मागितला, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेचे ढोंग उघडे पाडले.

शिवसेनेचे दुकान बंद होणार
शिवसेनेजवळ आता कोणताही कामधंदा उरलेला नाही. कोणतेही मुद्दे उरलेले नाहीत, म्हणून सुडाच्या भावनेतून माझ्याविरुद्ध ही मोहीम उघडली आहे, असे राणे म्हणाले. जोपर्यंत मी राजकारणात आणि मंत्रिमंडळात आहे, तोपर्यंत मी शिवसेना संपविणार आहे आणि आता तर शिवसेनेचे दुकान बंद होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शिवसेनेने हे कटकारस्थान आखले आहे. ना नेता ना मुद्दा असलेल्या शिवसेनेला आता डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागत आहे. यावरून आता शिवसेनेत एकही मर्द उरलेला नाही, असेही त्यांनी सुनावले.
प्रतिक्रिया
On 26/09/2010 04:10 PM चेतन, पुणे said:
म्हणजे शिवसेना संपविण्यासाठी तुम्हाला कोन्ग्रेस ने कायम मंत्री-मंडळात ठेवावे हेच तुम्हाला यातून सांगायचे आहे. खरे ना?
On 26/09/2010 02:13 PM uday gokhalay said:
श्री वैद्य साहेब, माझी चूक होत नसेल तर श्रीमती नीलम गोऱ्हे साहिबा यांनी भरपूर पक्ष धरले व सोडले आहेल. शिवसेना काय, श्री नारायण राणे काय किंवा बाईसाहेब काय - सर्वच एकाच माळेचे मणी आहेत. कोणालाच गाम्भिर्यानी घेण्यात काही अर्थ उरला नाहीये. सामान्य जनतेने त्यांचे आरोप आणि प्रत्यारोप वाचायचे, स्वताची घटकाभर करून घ्यायची व सोडून द्यायचे. ती मंडळी त्यांचे गेम खेळताहेत, आणि आपल्याला आपले आयुष्य जगायचे आहे. बाकी काही बोला, बातम्यापेक्षा विविध प्रतिक्रिया वाचण्यातच अधिक जास्त गम्मत येते.
On 26/09/2010 01:35 PM vishwas said:
I agree with Mr S.G. Vaidya & Mr, Jayaprakash. However Mr Rane please knte that knows you and the facts. All can understand the facts & can read between the lines. God bless you.
On 26-09-2010 11:43 AM asha mumbai said:
यावरून समजत आहे कि राणे सुद्धा सूड घेत आहेत......सगळे राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत......
On 26/09/2010 10:27 AM शिवराम गोपाळ वैद्य said:
सोनिया गांधी यांची हुजरेगिरी करत आयुष्य घालवत असलेल्या या काँग्रेसी नेत्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नेतृत्वाबद्दल असे अनुदार उद्गार काढावेत हे निषेधार्ह आहे. नारायण राणे यांनी "स्वाभिमान" संघटना चालवावी हाच एक सर्वात मोठा विनोद आहे. या संघटनेची आत्तापर्यंतची काय काय "कामे" आणि कर्तृत्व" आहे ते एकदा त्यांनी जनतेच्या माहितीसाठी जाहीर करावे.
On 26/09/2010 09:09 AM Dr Jayprakash said:
तुम्ही आपापसात भांडून मरा. देशाचे व जनतेचे काहीही होवो. तुम्हाला स्वतःची जहागिरी सांभाळण्यात व वाढविण्यातच रस आहे हे एक ना एक दिवस जनतेच्या लक्षात येईलच.


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: