Update: 
वाचकांचा पत्रव्यवहार  |  ई-पेपर  |  Bookmark  |  मागील अंक पहा  |  Download Font  |  लॉग-इन

प्रकल्पग्रस्तांच्या वाढीव दराबाबत धोरणात्मक बदल
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 30, 2010 AT 12:15 AM (IST)

नागपूर - 'प्रकल्पग्रस्तांना कमी मोबदला मिळतो, ही ओरड आहे. त्यामुळेच यापुढे आंध्रप्रदेश आणि गुजरातप्रमाणे प्रकल्प बघून भूमी संपादन करताना शासकीय दर वाढवून मिळतील. त्यासाठी धोरणात्मक बदल विचारार्थ' असल्याची माहिती महसूलमंत्री नारायण राणे यांनी आज येथे दिली. एका कार्यक्रमानिमित्त आले असताना बुधवारी पत्रकारांशी बोलत होते.

श्री. राणे म्हणाले, "प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यात वाढ व्हावी, अशी मागणी असते. त्यामुळे प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. यासाठी प्रकल्पाचे महत्त्वही लक्षात घेतले जाईल. त्यानुसार परिस्थती बघूनच मोबदला देण्यात येईल. आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये प्रकल्पग्रस्तांना मोबदला देताना समाधान करण्यात येते. त्यांची कुठलीही ओरड नसते. शासकीय दराने ते संतुष्ट असतात. राज्यातही असे करता येणे शक्‍य आहे. त्याकरिता 1966 च्या कायद्यात सुधारणा करण्यात येत आहे. दोन तालुके मिळून एक उपविभागीय अधिकारी असतील. तसेच भूमी संपादन करताना त्यांना अधिकारही देण्यात येईल.'

ते म्हणाले,"राज्यात सेझचे भविष्य चांगले नाही. आता कुठल्याही सेझला मंजुरी नाही. कोकणात सेझकरिता रिलायन्सने घोषित केलेले पॅकेज चांगले आहे. प्रतिएकर 10 ते 12 लाख ते देत आहेत. शिवाय जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयास नोकरीही देत आहेत,' याकडे त्यांनी लक्ष वेधले. राज्यात कुठेही ओला दुष्काळ नाही. जिथे अतिवृष्टी झाली. त्या तालुक्‍यातील अहवाल बघून मदत दिली जाईल. आणेवारीही पन्नास टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्याची माहिती नाही. कडधान्याचे पीक गेल्याचा अहवाल आल्यास मदत दिली जाईल. रेडीरेकनरचे दर त्या भागातील पायाभूत सुविधांवर अवलंबून असते. त्यामुळे दर ठरवितांना त्या भागातील विक्री दर बघूनच निर्णय घेतला जातो. तरीही शंका व तक्रार असल्यास महसूल विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. राणी यांनी केले.

अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर काहीही होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्‍त करीत पोलिस विभाग सज्ज असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले. 2 ऑक्‍टोबरला सेवाग्रामला लाखो कॉंग्रेस कार्यकर्ते येतील. कुठलीही घटना होणार नाही. सर्व काही शांततेत पार पडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी रेल्वेची विशेष बोगी बुक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

प्रदेशाध्यक्ष कुणीही चालेल!
'प्रदेशाध्यक्षपदासाठी मी एकही शिष्टमंडळ घेऊन गेलो नाही. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी देतील तो प्रदेशाध्यक्ष मान्य राहील. कुणासोबतही काम करायला मी तयार आहे. कारण माझ्या पदाला धोका नाही'', असे सांगत श्री. राणे यांनी राजकारणावरील प्रश्‍नाला "नो कॉमेन्ट्‌स' असे उत्तर दिले.
प्रतिक्रिया
On 30/09/2010 12:18 PM Tanaji B. Vadkara said:
Ranesaheb fakta Nagpurcha bagu naka tar sarvech prakalpgrastancha vichar kara & tyana nyay dya,jya lokani deshyachya vikasasathi aplya gharadarache holi keli tyat satara jilyachahi sinhacha vata ahe he visaru naka.Pratek prakalpgrastala sarakari nokarit samaun ghya nustacha berjecha rajakaran karu naka.RAYAT & SWAMI sarkhya shikshan saunstheth taseha banka, sarakari karyalaye, nagarpalika ya sarkhya thikani prakalpgrasthachya jaga bhara. Ok


आजचा सकाळ...
Advertise With Us | About Us | Contact Us | RSS Feeds | Archives | Group Site | SakaalTimes | Subscribe | एग्रोवन | साप्ताहिक सकाळ | Work with Us
© Copyrights 2009 eSakal.com - All rights reserved.
of
Powered By: